लोकमान्य टिळकांच्या अपेक्षा नगर महोत्सवातून पूर्ण – सीए अजय मुथा 

अहमदनगर- पुढचा नगर महोत्सव मनपाच्या नूतन सभागृहातच होईल, अशी स्पष्ट ग्वाही महापौर बाबासाहेब वाकळे यांनी रविवारी दिली. सावेडीतील संकुलाबरोबरच म्युनिसिपल कॉन्सिल हॉल पुढच्या सहा महिन्यात उभारणी पूर्ण झालेली असेल असे महापौरांनी नगर महोत्सवाच्या शुभारंभात स्पष्ट करतानांच नगरकरांनी राज्यांच्या कडकडाटात या घोषणेचे स्वागतही केले. मात्र नुसत्या टाळ्या वाजवू नका, मागणी करुन गप्प बसू नका तर आठ- दहा दिवसात या सुरु असलेल्या कामाला एकदा भेटही देत जा, अशी सूचनाही सुधीर मेहता यांना करण्यास ते विसरले नाहीत.

21 व्या नगर महोत्सवाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे, मर्चंट बँकेचे चेअरमन सीए अजय मुथा, सप्तरंग थियटर्सचे अध्यक्ष श्याम शिंदे, मार्ग कौन्सिलिंग अॅण्ड पर्सनॅलिटी सेंटरचे संचालक गायक संगीतकार विवेक दसरे, आणि नगर महोत्सवाचे मुख्य संयोजक सुधीर मेहता यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आला.

यावेळी नृत्य दिग्दर्शक राम पठारे, सिने दिग्दर्शक किरण बेरड, कवी रहेमान पठाण, सार्थक ओहोळ, दीपक ओहोळ, ऐश्‍वर्या गावडे, आरती अकोलकर, गानवर्धनच्या सौ.अमिता दसरे, सौ.मानसी खिस्ती, सुशांत नवले, पत्रकार राजेश सटाणकर, कस्तुरबा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशाली पेगड्याल, सौ.शिंदे, सौ.कल्पना मेहता, जितेंद्र अगरवाल सागर शिंदे, निखिल पेगडाल, प्रणय शहा आदि उपस्थित होते.

नगर महोत्सवाचे मुख्य संयोजक सुधीर मेहता यांनी नगर महोत्सवाच्या 20 वर्षांच्या वाटचालीच्या आढावा घेतला. स्पर्धक, पालक नगरकरांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळेच असंख्य अडचणी येत असल्या तरी नगर महोत्सवाचे आयोजन गणेशोत्सवात होतेच. गणेशोत्सवानंतरही काही स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील, असे त्यांनी सांगितले.

महापौरांनी नगरच्या सांस्कृतिक क्षेत्राची, संस्थांची सभागृहाची अडचण लक्षात घ्यावी. सहकार- माऊली आठ-आठ दिवस चालणार्‍या आमच्या कार्यक्रमांना परवडतही नाही आणि सभागृहावर किंवा मोठ्या कलाकारांचा एखाद्या दिवसाच्या कार्यक्रम करुन एकाच दिवशी लाखो रुपये खर्चण्यापेक्षा उपलब्ध निधीत जास्तीत जास्त स्थानिक आणि व्यवसायिक कलाकारांना व्यासपीठ देण्याचाच आम्ही 20 वर्षात प्रयत्न केल्याचे सांगितले.

आज कार्यक्रमाला सभागृह नाही, रंगभवन बंद आहे. म्युनसिपल कौन्सिल भस्मसात होऊन अनेक वर्षे झाली. छोट्या संस्थांसाठी कौन्सिल हॉल सारखा हक्काचा हॉल असला तर मोठी सोय होईल. महावीर कलादालनात वर्षभर पुस्तकांचे प्रदर्शन चालते. चित्रकारांना तेथे जागाच नाही, अशी खंत व्यक्त करुन महापौर पूर्वी नगरपालिकेचा सांस्कृतिक विभाग होता. शेकडो कार्यक्रम आम्ही कौन्सिल हॉलमध्ये केले. आज नाटके दूर, कलकारांना नाटकाच्या प्रॅक्टीससाठीही जागा नाहीयं.

क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमावर शहराची ओळख होते हे माझे सुद्धा मत असून, नगरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या सभागृहात सर्व समस्या लवकरच दूर झालेल्या असतील, अशा शब्दात महापौरांनी आश्‍वासन देऊन म्युनसिपल कौन्सिल हॉलच्या पुनर्‍उभारणीसाठी 30 लाखांची तरतुद केली असल्याचेही सांगितले. नगर महोत्सवाला जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे आपण करु अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नगरच्या कलाकारांसाठी अतिशय मोठे काम नगर महोत्सवातून होत असल्याचे महापौर म्हणाले.

मर्चंट बँकेचे अध्यक्ष सीए अजय मुथा यांनी सलग 20 वर्ष एक उपक्रम चालवणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. शेकडो विद्यार्थ्यांना नगर महोत्सवातून संधी मिळाली. अनेक कलाकार पुढे आले. लोकमान्य टिळकांच्या अपेक्षेतील गणेशोत्सव नगर महोत्सवातून साकारत असल्याचे सांगून मर्चंट बँक नगर महोत्सवाच्या प्रारंभापासून सहकार्य करत आहे. या अतिशय उपयुक्त उपक्रमाला यापुढेही बँकेचे सहकार्य मिळत राहील, असेही ते म्हणाले.

शाम शिंदे आणि राम पठारे असेही यांनीही मनोगत व्यक्त केले. श्याम शिंदे, विवेक दसरे, राम पठारे आणि सर्वच परिक्षकांचा महापौर आणि अजय मुथा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्याम शिंदे यांनी सिने दिग्ददर्शक किरण बेरड यांचा सत्कार केला. संयोजन विवेक दसरे आणि राम पठारे यांनी केले.