नगरच्या उड्डानपुलाच्या भुसंपादनासाठी 17.63 कोटींचा निधी महापालिकेत वर्ग – माजी खा.दिलीप गांधी

अहमदनगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त शहरात येत आहेत. येतांना मुख्यमंत्री मोकळ्या हातांनी आले नाहीत तर नगर शहराच्या बहुचर्चित उड्डानपुलाच्या भुसंपादन प्रकल्पासाठी त्यांनी मंजुर केलेल्या राज्य शासनाच्या हिस्याचे 52.88 कोटी पैकी 17.63 कोटी रुपयांचा पहिला हप्ता त्यांनी मनपाच्या खात्यात गुरुवारी जमा केले आहेत. तसे पत्र महाराष्ट्र शासनाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी पाठविले आहे, अशी माहिती माजी खा. दिलीप गांधी यांनी दिली.

दिलीप गांधी पुढे म्हणाले, नगर दक्षिण भागाचा खासदार असतांना मोठ्या प्रयत्नांनी नगर शहरातील उड्डानपुलास मंजूरी मिळवून केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने निधीही मंजुर केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केल्याने त्यांनी उड्डानपुलाच्या भुसंपादन प्रकल्पासाठी राज्य शासनाचा हिस्सा म्हणून 52.88 कोटी रुपये मंजुर केले होते. आता खासदार नसलो तरी उड्डाणपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरवठा चालू आहे. नगर शहरातील या उड्डाणपुलास कामास सुरुवात होणारच आहे. त्यासाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यातील भुसंपादन हे प्रमुख काम आता निधी उपलब्ध झाल्याने मार्गी लागणार आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य होत आहे. राज्य शासनाचा उर्वरित निधीही लवकरच प्राप्त होणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा