अहमदनगर क्लब येथे 14 डिसेंबरला ‘अर्बन मेला’

नगरमध्ये पहिल्यांदाच रशियन आर्टिस्टमार्फत बबल आर्ट, एल.ई.डी. अॅण्ड फायर अॅक्टचे आयोजन

अहमदनगर – उसळती तरूणाई, रसिक महिला, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘”Of the Spectrum Production” व I Love Nagar यांच्या संयुक्त विद्यमाने 14 डिसेंबर रोजी अर्बन मेला अहमदनगर क्लब येथे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे व इतर मेट्रो शहरात अशा पध्दतीच्या फ्ली मार्केट ही संकल्पना बरीच प्रसिध्द आहे. त्याच धरतीवर नगर शहरात आयोजन होत आहे. या मेळाव्यात सर्वांसाठी काहीतरी वेगळेपण असणार आहे. महिलांसाठी शॉपींग स्टॉल्स्, तरूणांसाठी म्युझिक कॉन्सर्ट, लहान मुलांसाठी फन अॅक्टिीव्हीट त्यामध्ये पॉट्री, फेस पेटींग याचबरोबर स्टॅण्डअप कॉमेडी करणारे भाडीपा, शहरातले प्रसिध्द कॅफेज आणि रेस्टॉरंटचे फुड स्टॉल आणि मौज-मजा असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत या अर्बन-मेलाचा आनंद नगरकरांना लुटता येणार आहे.

या फेस्टीवलमध्ये मुंबईचे प्रसिध्द बॅण्ड कनिक्श सेट (बॉलीवुड आर्टिस्ट) पुण्याचे जयदीप कलेक्टिव्ह, द अंश अॅण्ड उधामी प्रोजेक्ट, चिमुकल्यांसाठी बबल आर्ट, तुम्हा सर्वाना अंचबित करणारे जेरी द मॅजिशियन, रशियाहून येणारे फायर अॅण्ड एल.ई.डी.आर्ट, स्टॅण्डअपचे सुप्रसिध्द भाडीपा आणि बरेचकाही.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक वासन टोयोटा आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित असून पास किंवा टिकीटांसाठी आय लव नगर या अॅपवर सुध्दा उपलब्ध आहेत. सर्वांनी त्वरीत आपला प्रवेश निश्चित करावा यासाठी 7020695070 या नंबरवर संपर्क करावा.