एक रहस्यमय राणी …..

जगाच्या इतिहासात अनेक राण्या होऊन गेल्या आहेत. मात्र, काही मोजक्याच राण्या त्यांचे सौंदर्य आणि कर्तृत्व या दोन्ही बाबतीत इतिहासात अजरामर झालेल्या आहेत. दोन हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये होऊन गेलेली राणी क्लिओपात्राही यामध्ये समाविष्ट आहे. ती इतकी सुंदर होती की तिला ‘सौंदर्याची देवी’ ही म्हटले जात असे. तिचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच रहस्यमय होते. ती जितकी सुंदर होती तितकीच चतुर आणि कारस्थानीही होती.

पित्याच्या मृत्यूनंतर वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी क्लिओपात्रा आणि तिचा भाऊ टोलेमी दियोनिसस यांना संयुक्तरीत्या राज्य मिळाले. भावाला तिची सत्ता सहन झाली नाही आणि त्याने तिच्याविरुद्ध बंड केले. क्लिओपात्राला आपली सत्ता गमवावी लागली आणि तिने सीरियात आश्रय घेतला. मात्र, तिने धीर सोडला नाही आणि रोमचा तत्कालीन शासक ज्युलिअस सिझर याला आपल्या जाळ्यात ओढून तिने इजिप्तवर हल्ला करण्यास त्याला भाग पाडले. सिझरने टोलेमीला ठार करून क्लिओपात्राला इजिप्तचे राज्य दिले. सिझरनंतर तिचे सिझरचा उजवा हात असलेल्या मार्क अँटोनीबरोबरही संबंध निर्माण झाले. तिचा मृत्यूही रहस्यमयरीत्याच झाला.

रोमन राज्याचा पहिला सम्राट ऑगस्टसने क्लिओपात्राच्या पराभवानंतर इजिप्तमध्ये आपले शासन लागू केले होते. वर्षातील एक महिना आपल्या नावाचा होणार आहे हे समजताच त्याने क्लिओपात्राचा ज्या महिन्यात मृत्यू झाला त्या आठव्या महिन्याची (ऑगस्ट) निवड केली! क्लिओपात्राला रोममध्येच कैदी म्हणून ठेवण्याचा त्याचा विचार होता. मात्र, त्यापूर्वीच क्लिओपात्राने वयाच्या 39 व्या वर्षी आत्महत्या केली होती. तिने एका नागाचा स्वतःला दंश करवून घेऊन इहलोकीची यात्रा संपवली!

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा