गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावर आधारित संगीत नाटक

अहमदनगर- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावर आधारित नामचैतन्य या संगीत नाटकाचे नगरला आयोजन करण्यात आले असून, हे भक्तिमय संगीत नाटक नगरकरांसाठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती बालिकाश्रम रस्त्यावरील चिंतामणी हॉस्पिटल येथे असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उपासना केंद्राच्यावतीने देण्यात आली आहे.

हे नाटक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता नगरच्या माऊली सभागृहात होणार आहे.या नाटकात महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा घेण्यात आला आहे. या नाटकाच्या प्रवेशिका उपासना केंद्रातील कार्यालयात उपलब्ध आहेत.

भक्तांनी या संगीत नाटकाचा भक्तांनी तसेच नगरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपासना केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. नाट्यप्रयोगानंतर उपासना केंद्रात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.