वादातून मुलाकडून जन्मदात्रीचाच खुन

अहमदनगर- जेवणात मटन बनविले नाही, म्हणुन मुलाने आपल्या जन्मदात्रीचाच खुन केल्याची खळबळजनक घटना तळेगाव तांभोरे (ता. राहुरी) येथे बुधवारी (दि.7) सायंकाळी 7 वा. घडली.

याबाबतची हकीकत अशी की, राजेंद्र गोविंद लांडे (वय 43, रा. तळेगाव तांभोरे, ता.राहुरी) याने त्याची आई इंदुबाई गोविंद लांडे (वय 70) हिस जेवणामध्ये मटन करून दे, असे सांगितले. परंतु त्याच्या आईने जेवणात मटन केले नाही. याचा राग येऊन राजेंद्र याने लोखंडी फुकनीने आपल्या जन्मदात्रीस मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी राग अनावर झाल्याने त्याने शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनीही जबर मारहाण केली. यात जबर जखमी झालेल्या इंदुबाईंचा मृत्यू झाला.

याप्रकरणी राहुरी पोलिसांनी दिगंबर गोविंद लांडे (वय 38) यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र लांडे याच्या विरूध्द भादंविक 302 नुसार खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली असुन पोलिसांनी राजेंद्र लांडे यास तात्काळ अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.ए. बागुल हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा