म्युच्युअल फंडची निवड करताना ….

गुंतवणुकदारांना फटका कशामुळे?

फंड मॅनेजर हे म्युच्युअल फंडचा पैसा हा प्रामुख्याने शेअर बाजार आणि डेट (बॉंड) मध्ये गुंतवतात. गेल्या दोन वर्षात शेअर बाजाराने खूपच नकारात्मक परतावा दिला आहे. त्याचवेळी सप्टेंबर 2018 मध्ये आयएलएफएलनंतर एस्सेल समूह आणि डीएचएफएलमध्ये आर्थिक संकट आल्याने डेट बाजारावर परिणाम झाला आहे. अनेक डेट फंडना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. त्याचा वाईट परिणाम संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगावर झाला आहे. म्युच्युअल फंडमध्ये येणार्‍या मालमत्तेत घसरण झाली असून परतावाही कमी दिसून येत आहे.

स्थितीत सुधारणा होईल का?

सेबीने गुंतवुणकदारांच्या हितासाठी अनेक पावले उचलली आहेत. यात लिक्विड म्युच्युअल फंडला 20 टक्के रक्क रोख योजनेत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिड आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये सुधारणेची अपेक्षा आहे. कारण नोटाबंदीचा परिणाम संपला आहे. त्याचवेळी बजेटमध्ये मध्यम आकाराच्या कंपन्यांना करात सवलत दिली आहे. याशिवाय आणखी काही उपाययोजना केल्या आहेत. या आधारावर येत्या काही काळात बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

असा घ्या परतावा

कोणत्याही मित्राच्या किंवा एजंटच्या सांगण्यावरून फंडची निवड करू नये. कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करताना तो फंड आणि त्याच्या व्यवस्थापनाचे विश्‍लेषण करा. फंड समजून घेण्यात अडचण येत असेल तर एखाद्या अर्थ तज्ञाची मदत घ्या. योग्य फंडची निवड केल्यास चांगला परतावा मिळेल. म्युच्युअल फंडचे गेल्या पाच ते दहा वर्षातील परताव्याचे आकलन करावे. अर्थात परताव्याचे प्रमाण भविष्यातही तसेच राहिल, याची शाश्‍वती देता येत नाही. मात्र फंडची जुजबी कल्पना मिळते. तसेच एकाच ङ्गंडमध्ये सर्व पैसे गुंतवण्यापेक्षा मिड- कॅप स्मॉलकॅप, लार्ज कॅप, डायव्हर्सिटीफाइड अशा वेगवेगळ्या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा आणि नुकसानीत समतोल साधला जातो. त्याचबरोबर एसआयपी हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा उत्तम मार्ग आहे.

विचार करून विक्री करा

म्युच्युअल फंड हे नेहमीच दिर्घकाळासाठी चांगला परतावा देणारे योग्य वित्तिय साधन ठरले आहे. बाजारात काहीवेळा खराब वातावरण राहते आणि त्याचा परिणाम म्युच्युअल फंडच्या कामगिरीवर होतो. जर फंड सतत खराब कामगिरी करत असेल तर आणि त्याची फंड व्हॅल्यू कमी होत असेल तर त्याची विक्री करून बाहेर पडलेले बरे.

डिमॅटधारकांची संख्या वाढली

शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी डिमॅट खाते असणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून डिमॅटधारकांची संख्या मध्यम आणि लहान शहरात वेगाने वाढली आहे. अर्थात डिमॅट सुरू करण्यात मेट्रो शहर अद्याप आघाडीवर आहेत. मात्र ट्रेंडमध्ये वेगाने बदल होत आहे. लहान शहरातही डिमॅटधारकांची संख्या वाढत चालली आहे. सेबीच्या मते 2019 मध्ये आतापर्यंत 41 लाख नवीन खाते सुरू झाले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा