म्युच्युअल फंडमधून पैसा काढताना

सध्या सर्व गुंतवणूकदारांसाठी कठिण काळ आहे. अशा काळात भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला जावू शकतो. आपले आर्थिक ध्येय लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला हवेत. जर गरज असेल तर फंड निश्‍चितच विकावेत. टिम हरङ्गोर्डचे पुस्तक अंडरकव्हर इकनॉमिस्टमधून एक उदाहरण घेता येईल. त्यात म्हटले की, गुंतवणूकदार नुकसान आणि फायद्यावर कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्यासाठी लेखकाने यावर बराच काळ अभ्यास केला. यासाठी त्यांनी जगभरातील जुगारबाजांचा अड्डा समजल्या जाणार्‍या लास वेगासमध्ये वर्ल्ड सीरिज ऑफ पोकरसारख्या स्पर्धेत सहभाग घेतला तेथील लोकांच्या प्रतिक्रियांचे आकलन केले. यात त्यांनी खूपच तार्किक खेळाडू म्हणून सांगितले. यात एक खेळाडू ख्रिस फर्ग्युसन हा डॉक्टरेट होता तर त्यावेळी तो वर्ल्ड चॅम्पियन झाला होता.

पराभवानंतर चुका शोधा : कोणत्याही खेळाप्रमाणे पोकरचे विश्‍लेषण हे तार्किक मुदद्यावर करता येते. मात्र खेळात भावना आणि मानसिक स्थितीची मोठी भूमिका असते. एकवेळ अशी येते की तेथे भावनेवर नियंत्रण ठेवणे कठिण जाते. जर काही गडबड झाल्यास मोठी चूक होते. अशी स्थिती मोठ्या पराभवानंतर होऊ शकते. अशावेळी कोणताही विचार न करता आक्रमक पद्धतीने बाजी लावण्यासाठी काही खेळाडू आतूर झालेले असतात. अशावेळी चूक होण्याची शक्यता अधिक राहते. ही मंडळी काहीतरी मिळवण्यासाठी जोखीम उचलतात. अर्थात आपल्या चुका शोधणे आणि भविष्यात पुन्हा चूक घडू नये याची दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

अनुभवी व्यक्तीदेखील गोंधळात

इक्विटी फंडमधून पैसा कधी काढावा यावरूनही अनुभवी गुंतवणूकदार देखील गोंधळात पडतात. बाजाराच्या पडत्या काळात त्यांची द्विधा मनस्थिती दिसून येते. त्यामुळे गुंतवणूक सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे की नाही याबाबतही ते ठाम राहत नाहीत. अशावेळी भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला जावू शकतो आणि पुढे पश्‍चातापाची वेळ येऊ शकते. प्रत्यक्षात अनुभवी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार चुकीचे गृहित धरून फंड विक्री करतात. अशा स्थितीत ज्याप्रमाणात गुंतवणुकीची चर्चा होते, त्याप्रमाणात विक्रीबाबत व्यापक चर्चा होताना दिसून येत नाही.

फंड विकण्याचे अनेक कारणे : फंड विकण्याचे अनेक कारणे असू शकतात. मात्र फंडशी कायम जवळ राहणे ही चांगली बाब आहे. कोणत्याही फंडची विक्री करणारे गुंतवणूकदार हे तीन कारणे सांगतात. पहिले म्हणजे मिळणारा फायदा, दुसरे म्हणजे नुकसान आणि तिसरे म्हणजे नुकसानही होत नाही आणि फायदाही मिळत नाही.

मूल्य वाढल्यास नफेखोरी : काहींच्या मते, जर गुंतवणुकीचे मूल्य वाढले तर मी नफेखोरी का करु नये. किंवा एखाद्या फंडचे मूल्य घसरले असेल तर मी बाहेर का पडू नये, असाही विचार मांडला जातो. काही फंड विकण्यासाठी कोणता युक्तीवाद योग्य वाटतो. तसे पाहिले तर वरील कारणापैकी एकही वाटत नाही.

आर्थिक लक्ष्यावर आधारित निर्णय घ्या : गुंतवणूकदारांनी फंड कधी विकावा हा एक गहन प्रश्‍न आहे. आपल्या आर्थिक ध्येयानुसार फंड विक्रीचा निर्णय घ्यायला हवा. जेव्हा पैशाची गरज आहे, तेव्हा फंडची विक्री करावी. गुंतवणूकीचे मुख्य ध्येय हे गुंतवणूक करणे नाही तर ते विक्रीने साध्य होते. तरच आपण ध्येयापर्यंत पोचू शकू.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा