मोटारसायकलची चोरी

अहमदनगर – मच्छिंद्र सिताराम दारकुंडे (रा. बहिरवाडी, ता. नगर) यांची जेऊर बसस्टॅण्ड येथे लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एम एच 16 ए आय 5642) अज्ञात चोरांनी चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक कावरे हे करीत आहेत.