बोल्हेगाव येथे मोटारसायकल पेटविली

अहमदनगर – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून राग येऊन मोटार सायकलवर पेट्रोल टाकुन पेटवुन दिली. हि घटना नगर- मनमाड रोडवरील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे मंगळवारी (दि.15) पहाटे 3.45 वाजता घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, विक्रम राजेंद्र शेवंते (वय 26, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) याने सुशांत पोपट नांगरे (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) व अन्य तीन अनोळखी साथीदारा विरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात हाणामारीची तक्रार दिली होती. याचा मनात राग धरून सुशांत पोपट नांगरे व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी विक्रम शेवंते यांची घरासमोर लावलेली मोटारसायकल (क्र. एम एच 16 बी एन 4674) वर पेट्रोल टाकुन पेटवून दिली. या आगीत मोटारसायकल जळुन खाक झाली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी विक्रम शेवंते यांच्या फिर्यादीवरून सुशांत शेवंते व अन्य तिघांविरूध्द भारतीय दंड विधान कलम 435, 34 प्रमाणे जळीताच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार ए. पी. भोसले हे करीत आहेत.