मोहनथाळ

साहित्य – 1 वाटी चणाडाळीचे पीठ, तूप, दूध, केशर, खवा, 1 वाटी साखर, सुकामेवा, वेलची पूड.

कृती – सर्वप्रथम भांड्यात चणाडाळीचे पीठ, 1 चमचा दूध व 1 चमचा तूप एकत्र करून ठेवावे, मग तयार मिश्रण 5 मिनिटानंतर चाळून घ्यावे. भांड्यात 1/2 वाटी तूप गरम करून त्यात चाळलेले चणाडाळीचे पीठ भाजून घ्यावे व दुसर्‍या भांड्यात साधारण 1 वाटी साखर व साखर बुडेल इतके पाणी एकत्र गरम करून त्याचा पाक तयार करावा.

भाजलेल्या चणाडाळीच्या मिश्रणामध्ये खवा, सुकामेवा व साखरेचा पाक घालुन, तूप लावलेल्या ताटात थापावे व सेट करायला ठेवावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा