फायदे मोबाईल वॉलेटचे

मोबाईल वॉलेट हे एकप्रकारचे डिजिटल व्यवहार करणारे साधन आहे. त्याचा वापर आरक्षण, खरेदी, पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी केला जातो. हे वॉलेट मोबाइलमध्ये इन्स्टॉल होते. म्हणूनच त्याला मोबाईल वॉलेट म्हणतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या तुलनेत मोबाइल वॉलेटचे व्यवहार करणे सुलभ असते.

तीन प्रकारचे वॉलेट क्लोज्ड वॉलेट : क्लोज्ड वॉलेटचा वापर हा एखाद्या कंपनीचे उत्पादन खरेदी आणि सेवेसाठी केला जातो. या वॉलेटमध्ये कोणत्याही प्रकारची रोकड जमा केली जात नाही. मेक माय ट्रिप, जबॉंग, आदी अॅपचा उल्लेख करता येईल.

सेमी क्लोज्ड वॉलेट : याप्रकारच्या वॉलेटमधूनही रोकड काढली जात नाही. हे वॉलेट वेगवेगळ्या ठिकाणी सामान आणि सेवेचे पेमेट करण्यासाठी वापरले जाते अर्थात मोबाइल वॅलेट कंपनीचा अन्य वॉलेट कंपनीशी करार झालेला असावा. पेटिएम, मोबिक्विक, पयूमनी, ऑक्सीजन आदी. भारतात सर्वाधिक वापर याच श्रेणीतील मोबाईल वॉलेटचा होतो.

ओपन वॉलेट : अशा प्रकारच्या वॉलेटमधून पैसे काढले जातात. याशिवाय त्याचा वापर सेमी क्लोज्ड वॉलेटप्रमाणेही केला जातो. व्होडाफोनचे एम पैसा हे चांगले उदाहरण सांगता येईल.

वापराचे फायदे

मोबाइल वॉलेट असल्यास आपल्याला रोकड बाळगणे, एटीएम काड वापरणे किंवा एटीएमच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मोबाईल वॉलेट आपल्याला कोठेही आणि कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्याची सुविधा देते.

खर्चावर लक्ष : मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून होणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवता येते आपण एका महिन्यात किंवा एका आठवड्यातील खर्चाचा सहजपणे आढावा घेऊ शकता. यापासून आपल्याला बजेट तयार करणे सोपे जाते आणि खर्चावर लक्ष ठेवता येते.

रोकडच्या तुलनेत सुरक्षित : मोबाईल हरविणे किंवा चोरी गेल्यानंतरही मोबाईल वॉलेटचा गैरवापर करणे कठिण आहे. मोबाइल वॉलेटचा वापर करण्यापूर्वी कंपनी पिन आणि पॅटनची माहिती मागते. रोख स्थितीत गैरव्यवहार अशक्य आहेत.

बजेटची शिस्त : वॉलेटच्या माध्यमातून आपण खर्चाची माहिती सहजणे मिळवू शकतो. यातून आपल्याला खर्चाच्या पॅटर्नचे आकलन करता येते. अशा स्थितीत आपण खर्चावर नियत्रण ठेऊ शकतो आणि बचतीत वाढ करु शकतो. उधारीची

सवय नाही : मोबाईल वॉलेटमुळे आपल्याला उधारीची सवय लागत नाही. रोख रक्कम नसल्याने आपण दुकानदाराकडून उधारीवर माल घेतो. मात्र मोबाईल वॉलेट असल्याने आपण तात्काळ पेमेंट करतो.