जीवनात नैराश्य असलेल्या व्यक्ती आत्महत्येचा विचार करतात

वॉक फॉर मेन्टल हेल्थ मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर – स्पर्धेच्या युगात नैराश्य वाढले आहे. जीवनात नैराश्य आलेल्या व्यक्ती आत्महत्येचा विचार करतात. एखाद्या युध्दापेक्षा जास्त संख्येने नागरिक आत्महत्या करुन आपले अमूल्य जीवन संपवत आहे. भारतात युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी मोठी जागृती करण्याची गरज असून, त्यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. तर नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तींशी संवाद साधून त्याचे मन हलके करण्याचे आवाहन डॉ.कैलाश झालानी यांनी केले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त साईदीप हेल्थ केअर अॅण्ड रिसर्च सेंटर, श्री रामअवतार मानधना चॅरीटेबल ट्रस्ट व नगर रायझिंग फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वॉक फॉर मेंन्टल हेल्थ या मीनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. जीवनात वाढते ताण-तणाव, आरोग्याचे प्रश्‍न गंभीर बनत असताना, समाजात वाढत चाललेल्या आत्महत्येचे प्रमाण थांबविण्याचा संदेश देण्यासाठी या मीनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अबालवृध्दांसह युवक-युवती व महिला अत्यंत उत्साह व जोशपूर्णपणे धावल्या.

आय.टी. कमिश्‍नर मिलिंद तावरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेस प्रारंभ करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साईदीप हेल्थ केअरचे चेअरमन डॉ.एस.एस. दीपक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप मुरंबीकर, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आय.टी. असिस्टंट कमिश्‍नर प्रेम नायर, डॉ.रामनाथ धूत, डॉ.कैलाश झालानी, डॉ. रविंद्र सोमाणी, डॉ.विजयकुमार देशपांडे, डॉ.श्यामसुंदर केकडे, डॉ.राहुल धूत, डॉ.किरण दीपक, डॉ.वैशाली किरण, डॉ.हरमीत कथूरिया, डॉ.अनिलकुमार कुर्‍हाडे, डॉ.अश्‍विन झालानी, डॉ.रोहित धूत, डॉ.पायल धूत, साईदीप हेल्थ केयर ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा सोमाणी, कार्यकारी अध्यक्षा ज्योती दीपक, अनिता झालानी, सुनीता देशपांडे, अंजू कथूरिया, संदीप जोशी, मानधना ट्रस्टचे मोहन मानधना, पराग मानधना, कोमल मानधना आदींसह साईदीप हेल्थ केअरचे अधिकारी, कर्मचारी नगर रायझिंगचे कर्मचारी उपस्थित होते.

बालिकाश्रम रोड लक्ष्मी उद्यान जवळील बालभवन मानधना फार्म हाऊस येथून या स्पर्धेला प्रारंभ झाले. प्रारंभी संगीताच्या तालावर रनर्सकडून व्यायाम करुन घेण्यात आले. ही मॅरेथॉन 3 व 5 कि.मी. या दोन गटात झाली. यामध्ये 900 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. बालिकाश्रम येथून अंतर्गत बोल्हेगाव रस्त्यापर्यंत 3 व 5 कि.मी. पर्यंतचे अंतर रनर्सनी पूर्ण केले. मोफत नांव नोंदनी करुन स्पर्धकांना यावेळी टी शर्ट वाटण्यात आले.

डॉ. एस. एस. दीपक यांनी शाररीक आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राखणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्याचे रुग्ण लवकर लक्षात येत नाही. प्रबोधन व समुपदेशन हा त्यांच्यावर मुख्य उपाय आहे. आनंदी जीवनासाठी शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी तणावमुक्त जीवन जगण्याचा सल्ला दिला.

नरेंद्र फिरोदिया यांनी नगरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगर रायझिंग वर्षभर मिनी मॅरेथॉन सारखे उपक्रम घेत असते. आरोग्य सदृढ राहून चांगले जीवन जगण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असून, मन व शरीराने निरोगी व्यक्ती आनंदी जीवन जगू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

मॅरेथॉनच्या समारोपनंतर साईदीप हेल्थ केअरच्या कर्मचार्‍यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मानसिक नैराश्याची कारणे, त्यातून होणार्‍या आत्महत्या व त्यावर उपाययोजने संदर्भात जागृती केली. या नाटकाचे दिग्दर्शन किसन ढोली यांनी केले होते. नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या पथनाट्यास दाद दिली. डॉ.अश्‍विन झालानी यांनी मानसिक आजारावर मार्गदर्शन करुन, आत्महत्या रोखण्याचा संदेश दिला. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जगदीप मक्कर, अतुल डागा, दिनेश भाटिया, योगेश खरपुडे, गौतम जायभाय, महेश गोपाळकृष्णन, अमित अंदोत्रा आदींसह साईदीप हेल्थ केअर व नगर रायझिंगच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.