अहमदनगर शहरात आणखी ५ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर ; केडगाव मध्ये २ तर सावेडीत ३ ठिकाणांचा समावेश

अहमदनगर – नगर शहरासह उपनगरी भागात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर महापालिका क्षेत्रात  बुधवारी (दि.१७) दुपारी आणखी ५ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. त्यामुळे शहरातील मायक्रो कंन्टेन्मेंट झोनची संख्या १५ झाली आहे.

महापालिका आयुक्तांनी बुधवारी (दि.१७) दुपारी जाहीर केलेल्या मायक्रो कंन्टेन्मेंट झोनमध्ये केडगाव येथील अयोध्यानगर, श्रीराम मंदिर व परिसर दि.३० मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तर उदयनराजे नगर मधील श्री.रासकर यांचे घर ते कुंभार यांचे घर हा परिसर दि.२८ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत. बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळा भाग्योदय रेसिडेन्सी परिसर दि.२८ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तर सावेडी भागातील भाग्योदय सोसायटीचे प्रवेशद्वार आणि भिंगारदिवे मळा शेजारील प्रेमदान हडको वसाहतीतील श्री.कल्याणकर यांचे घर व शेजारील परिसर हे दि.३० मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत  मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.

महापालिका प्रशासनाने या पूर्वी सावेडी उपनगरातील बोल्हेगाव परिसरातील मनोलीलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांचे घर हा परिसर, राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर ते उत्तरेकडील अपार्टमेंट पर्यंत. तसेच गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदी कैलास बी इमारत हे परिसर दि.२६ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.

त्यानंतर सोमवारी (दि.15) बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथील आर्यन अपार्टमेंट मधील विंग बी आणि सी इमारत, सिव्हील हडकोपरिसरातील गणेश चौक, श्री.चंद्रकांत बोरुडे घर ते श्रीमती नलिनी चोथवे घर परिसर, तसेच कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील जयश्री कॉलनी मधील कव्हाणे घर ते ज्ञानेश्वरी बंगला हे परिसर तसेच केडगाव देवी रोडवरील बनकर मळा, सारसनगर चिपाडे मळा येथील पावन गणपती मंदिरा समोरील प्रतिक्षा रो-हाऊसिंग, श्री साबळे यांचे घर ते श्री. तन्विर यांचे घर, नगर-पुणे रोडवर माणिकनगर येथील नूतन बंगला ते राजेंद्र बोरा यांचे घर व परिसर, नगर-पुणे रोड जवळील निलायम हाऊसिंग सोसायटी मधील लाईन क्रमांक 2 मधील श्री. पानमळकर यांचे घर ते श्री. होशिंग यांचे घर व परिसर हे भाग दि.२८ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.

या झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत. तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा