मेहेरबाबांच्या न्यू लाईफला 16 ऑक्टोबरला 70 वर्ष पूर्ण

विविध कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर- अवतार मेहेरबाबांनी 16 ऑक्टोबर 1949 रोजी नवजीवन यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी आपली सर्व संपत्ती दुसर्‍याच्या नावावर केली, स्वत: सह सोबतच्या 20 शिष्यांनाही आपली सर्व चल-अचल संपत्ती काहीही स्वत:जवळ ठेवली नाही असे आशारहित जीवन जगणे म्हणजे नवजीवन होय, अशा या नवजीवनाला 70 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त मेहेरबाबा केंद्र, नगर व अरणगाव तसेच सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. मेहेरनाथ कलचुरी यांनी श्रमयुक्त जीवन, ध्यानधारणा, भिक्षा मागून खाणे व भटकंती (फिरणे) अश्या असाह्य, पूर्ण आशारहित जीवन, देवाच्या भरवशावर जगणे. त्यांनी 2 वर्ष जगले शेवटी बनारसला आपल्या जवळील सर्व सामान वाटून टाकले व जीवनाचे चार प्रतिक म्हणून पांढरा घोडा – शांतीचे प्रतिक, कष्टाचे प्रतिक-गाढव, सहन शक्तीचे प्रतिक-उंट व त्यागाचे प्रतिक-गाय हे चार प्राणी आपल्या पदयात्रेत घेतले.

नवजीवन प्रवासात मेहेरबाबा ईश्वरतत्त्वाची कवचकुंडले बाजूला सारून एखाद्या साधकाप्रमाणे साधे निर्हेतुक जीवन जगत होते. आयुष्यात येणार्‍या सर्व आपत्तींना तोंड देण्याची त्यांची सिद्धता होती. नवजीवनात सर्वसंग परित्याग करून म्हणजे आपल्यापुरते का होईना घरादारावर तुळशीपत्र ठेवून, नातेसंबंध तोडून, इच्छा वासनांना तिलांजली देऊन अगदी संन्यस्त वृत्तीने जगायची तयारी ठेवा. नवजीवन पर्वात भिक्षा मागून गुजराण करायची आहे. आज इथे, तर उद्या तिथे असे भटके जीवन जगायचे आहे. भूमीचे अंथरूण आकाशाचे पांघरूण, वेळप्रसंगी उघड्यावर झोपण्याची तयारी ठेवा, असे बाबांनी सांगितले. खिशात एक पैसाही न बाळगता निराधार जीवन जगणे, हा या प्रवासाचा उद्देश होता.

नवीन जीवन बद्दल मेहेरबाबांनी लिहिले आहे की न्यू जीवन अंतहीन आहे आणि अगदी माझे शारीरिक मृत्यूनंतर तो खोटेपणा खोटे, द्वेष, राग, लोभ आणि लालसा पूर्ण निवृत्तीची जीवन जगू ज्यांना जिवंत राहू द्यावी आणि हे सर्व कोण, साध्य करण्यासाठी, नाही निंदा करू कलंक नाही वंदन स्वीकारणार्‍या भौतिक मालमत्ता किंवा शक्ती शोधतात, कुठलाही सन्मान लोभ धरु किंवा ऐहिक वादविवाद नाही, कोणीही आणि काहीही भीती वाटते कोणाला नाही हानी नाही.

देव संपूर्णपणे आणि पूर्णपणे अवलंबून असणार्‍या आणि पूर्णपणे प्रेमळ फायद्यासाठी जे देवावर प्रेम करतात त्या अशा कोणत्याही आध्यात्मिक किंवा साहित्य प्रतिफळ भरून पावले अपेक्षा नाही तरीही देवाच्या प्रेमी आणि प्रकटीकरण वास्तव विश्वास आणि कोण शंभर टक्के सुखी आहे ज्याला सर्व त्रास सहन करावा लागला नाही, तोंड मनापासून शौर्याने, संकटे निराश न करता सत्य हात आणि कोण जा आणि द्या आणि नाही जातीला महत्त्व, पंथ आणि धार्मिक समारंभ देऊ नका. न्यू जीवन हे जगणे एक आहे, जरी सर्वकाळ स्वतः जगेल.