जिल्हा नियोजन समितीची शनिवारी नगरमध्ये बैठक

अहमदनगर- महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 15 जून रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत 21 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीचे इतिवृत्तास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु.जाती उपयोजना) सन 2018-19 या वर्षातील माहे मार्च 2019 अखेर खर्चास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) सन 2019-20 प्रारुप आराखडा, अध्यक्ष महोदयांच्या संमतीने येणारे आयत्या वेळीचे विषय.

सदर बैठकीस संबंधित विभागांनी अद्यावत माहितीसह स्वतः उपस्थित रहावे, प्रतिनिधी पाठवू नये असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.