निसर्गाशी मैत्री केली तर वृक्षसंवर्धन होईल – प्राचार्य मुकुंद सातारकर

अहमदनगर- वातावरण बदलाचा फटका हा सर्वांनाच बसत आहे. लहरी वातावरणामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी दुष्काळ अशी सद्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा आपण बारकाईने विचार करायला हवा. ही वेळ आपणच निसर्गावर आणली आहे. जंगलेच्या जंगले नष्ट करून तेथे सिमेंटची शहरे उभी राहू लागली आहेत. जंगली प्राण्यांचा ही त्यात र्‍हास होताना दिसत आहे. निसर्ग हे एक मोठं चक्र आहे. ते जर टिकवायच असेल, तर प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून वृक्षसंवर्धन करावे, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद सातारकर यांनी केले.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राचार्य मुकुंद सातारकर व डॉ. दादासाहेब करंजुले यांच्या मार्गदर्शनाखाली मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विद्यार्थी असोसिएशनच्यावतीने विद्यार्थ्यांनी मैत्री दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. ताजी, अधिव्याख्याता कुलकर्णी, प्रा. माने, प्रा. वडितके, प्रा. कुमावत, प्रा. शिंदोरे, प्रा. चिल्लल, आदिनाथ आहेर, आदित्य गुरुळे, सखाराम गडमिचे, श्रीनाथ औटी, संकेत हासे, विकास चांडे, प्रसाद मुंगसे, आकाश रायते, नीलेश तांदळे, ऋषिकेश पुंड, सचिन म्हस्के, कार्तिक गागरे, मयूर सोनवणे, रोहित जठार, आनंद वैरागर, अजय ठोकळे, श्रेयस क्षीरसागर, अमोल फुंदे, मयूर जावळे, दिनेश कुरी, गौरव रानमाळे, राम शेवाळे, जयदीप तांबे, नीलेश दाते, नितीन अभंग, साक्षी भंडारे, वैष्णवी भागवत, पूजा काकडे आदी उपस्थित होते.

प्राचार्य मुकुंद सातारकर पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने समाजसेवेच्या भावनेतून निदान एक तरी झाड लावून तो जगवण्याचा प्रयत्न केल्यास वातावरण समतोल राखण्यात खारीचा वाटा उचलल्यासारखे आहे. वर्षभर आपण मदर डे, फादर डे, फ्रेंडशीप डे साजरे करतो. ते साजरे करताना आपण निदान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास आयुष्यभर सुखाने समाधानाने निरोगी जीवन जगू. मोठ्या प्रमाणात होणार्‍या वृक्षतोडीचा मानवी आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असून, हे असेच चालू राहिले तर भविष्यात मानवी जीवन संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. आज मॅकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्यावतीने मैत्री दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या वृक्षारोपण केले, ही एक कौतुकास्पद बाब आहे, असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. दादासाहेब करंजुले म्हणाले की, अभियांत्रिकी विद्यालयामधील मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विद्यार्थी असो.च्यावतीने मैत्री दिनाचे औचित्य साधून इतर खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून प्रत्येक विद्यार्थ्याने झाड जगवण्याचा संकल्प केला आहे. शिक्षणाबरोबर निसर्ग संवर्धन ही काळाची गरज ओळखून प्रत्येक विद्यालयात अशाप्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्यावतीने राबवावेत, असे सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा