महापालिकेकच्या नगररचना विभागातील 9 कर्मचार्‍यांच्या बदल्या

तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आयुक्त भालसिंग यांचे आदेश

अहमदनगर- महापालिकेच्या नगररचना विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या 9 कर्मचार्‍यांच्या आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी गुरुवारी (दि.10) तडकाफडकी इतर विभागात बदल्या करत त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण 18 कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (दि.10) काढले असून त्यामध्ये नगररचना विभागातील 9 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये गणेश क्यातम (पाणीपुरवठा विभाग), सतिष दारकुंडे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), श्रीकांत दरेकर (प्रभाग समिती क्रमांक 1), किशोर जाधव (स्थानिक संस्था कर), प्रविण नेमाणे (सामान्य प्रशासन विभाग), सुधीर सुळ (प्रभाग समिती क्रमांक 4), जितेंद्र सासवडकर (प्रसिद्धी विभाग), संजय चव्हाण (प्रभाग समिती क्रमांक 4), अंकुश कोतकर (प्रभाग समिती क्रमांक 4) यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभागातील कन्हैय्या छप्पानिया, प्रसिद्धी विभागातील राजाराम मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभागातील नितीन गोरे, प्रभाग समिती क्रमांक 1 चे सुनिल खलचे, प्रभाग समिती क्रमांक 4 चे कृष्णा साळवे, दिनेश बारनौक, स्थानिक संस्था करचे राजेश लवांडे, सामान्य प्रशासन विभागातील दत्तात्रय ढवळे, प्रभाग समिती क्रमांक 3 मधील राजेंद्र खडतरे या 9 जणांची नगररचना विभागात बदली करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना तातडीने पुर्वीच्या विभागातून कार्यमुक्त करत नवीन विभागात रुजू होवून कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयुक्तांनी तडकाफडकी केलेल्या या बदल्यांमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा