महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई

‘झाड लावा अन् क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट भोवली

अहमदनगर – महापालिका कर्मचार्‍यांना उद्देशून ’झाड लावा अन् क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट सोशल मिडीयावर टाकणे महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या वादग्रस्त पोस्टची गांभिर्याने दखल घेत महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख यास गुरुवारी (दि.11) दुपारी निलंबित केले आहे.

शासनाने दिलेले वृक्ष लागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून नागरिक, स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले जात आहे. नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. मात्र महापालिकेच्या या अधिकार्‍याने त्यांच्याच कर्मचार्‍यांसाठी भन्नाट योजना आखली असून ह्या योजनेची ’झाडे लावा.. क्वार्टर मिळवा’ ही वादग्रस्त पोस्ट व्हाटस् अॅप ग्रुप व्हायरल झाली आहे.

’सर्व मुकादमांना सुवर्णसंधी.. पावसाळ्यात झाड लावा.. वाढवा आणि हिवाळ्यात माझ्याकडून क्वार्टर फ्री मिळवा.. झाडे लावा क्वार्टर मिळवा संधीचा लाभ घ्यावा’, अशा आशयाचा संदेश संबंधित अधिकार्‍याने मुकादमांना उद्देशून पोस्ट केला होता. मनपाच्या विविध व्हाटस् अॅप ग्रुपवर हा संदेश व्हायरल झाला. महापालिका कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली. कर्मचार्‍यांना व्यसनाधीन बनविण्यासाठी अधिकारी प्रोत्साहन देत आहेत का? असा सवाल उपस्थित करत युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना विचारणा केली. तसेच महापालिकेत सुमारे 3500 कर्मचारी आहेत. त्यामुळे 3500 क्वार्टरची व्यवस्था करा. आम्ही एका दिवसात तेवढी झाडे लावतो. या शिवाय ही स्कीम पुढे चालू ठेवण्यासाठी अंदाजपत्रकातही तशी तरतूद करा. अशी उपरोधिक मागणीही केली.

व्हायरल झालेल्या या वादग्रस्त पोस्टची आयुक्त भालसिंग यांनी गांभिर्याने दखल घेत शासकीय योजनेची खिल्ली उडविल्याबद्दल स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा