कोको-मावा मोदक

साहित्य – मैदा 2 वाट्या, तूप वा तेल मोहनासाठी व तळण्यासाठी, नारळाचा खव 1 वाटी, खवा अर्धी वाटी, साखर दीड वाटी, सुकामेव्याचे तुकडे 2 चमचे, तूप 2 चमचे, खसखस (भाजून) अर्धा चमचा, वेलची पूड अर्धा चमचा, पाकासाठी साखर 1 वाटी, पाणी अर्धी वाटी, केशरी रंग चिमूटभर, सजवण्यासाठी सुकामेवा, चारोळी, टूटीफ्रुटी, चांदीचा वर्ख.

कृती – सर्वप्रथम मैद्यात तूप वा तेलाचे मोहन टाकून पाण्यात घट्ट पीठ मळा. एका पॅनमध्ये तूप तापवून नारळाचा खव भाजा. नंतर त्यात साखर मिसळा. मिश्रण दाट झाल्यानंतर कुस्करलेला खवा मिसळा व भाजा. नंतर वेलची, टुटीफ्रुटी, सुकामेव्याचे तुकडे टाकून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर साखरेचा तीनतारी पाक बनवा. त्यात थोडासा रंग मिसळा.

आता मळलेल्या पिठाचा एक उंडा घेऊन लाटा. नंतर त्यात नारळाचे सारण भरा व पुरचुंडीप्रमाणे बंद करून मोदकाचा आकार द्या व गरम तुपात वा तेलात तळा. शेवटी सारे मोदक पाकात बुडवून काढा व सुकामेव्याचा चुरा वरून चिकटवा.