अध्यक्षपदी सय्यद खलील तर सचिव आरिफ सय्यद

मौलाना आझाद महोत्सव समितीच्या

अहमदनगर- 11 नोव्हेंबर रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने 11 ते 23 नोव्हेंबरपर्यंत ‘कौमी एकता सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समितीचे गठन करण्यात आले असून सर्वोनुमते या समितीच्या अध्यक्षपदी तन्जीमे उर्दू अदबचे अध्यक्ष सय्यद खलील अ करीम यांची तर सचिवपदी जीवन फौंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली.

समितीतील इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष – इंजि.अनिस शेख, इंजि. इकबाल सय्यद. सहसचिव – नादीर खान, खजिनदार – निसार बागवान, सदस्य – सय्यद शफकत, शेख अयाज गफुर, नईम सरदार, अतिकभाई शेख, तन्वीरभाई चष्मावाला, इंजि.वाजिद पठाण, शेख फैय्याज (नगरसेवक), सय्यद वहाब, शेख तारिक, शेख इकबाल मुबारक, शेख आदिल रियाज, राजूभाई शेख, अबरार शेख, अतिक भाई, जावेद तांबोळी, जावेद मास्टर, निशांत दातीर, राजु खरपुडे, अजय लयचेट्टी, श्रीनिवास बुरगुल, सल्लागार – युनूसभाई तांबटकर, सलामसर, शरफुद्दीन सर, बहिरनाथ वाकळे, इंजि.अभिजित वाघ.