गणित गुंतवणुकीचे

जगात टेक्नॉलॉजी कंपन्यांचा प्रभाव वाढल्याने आणि त्या आधारावर प्रत्येक उद्योगात बदल झाला असला तरी जगातील काही नामांकित गुंतवणूकदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वॉरेन बफे आणि चार्ली मंगर यांची गुंतवणुकीची टेक्नॉलॉजीची बस हुकली होती. जेव्हा अॅपल कंपनीचा कन्झ्यूमर ड्युरेबल कंपनीमध्ये बदल झाला होता आणि आयबीएम कंपनी ही बिझनेस सर्व्हिस कंपनी बनली तेव्हा या दोघांनी त्यात गुंतवणूक सुरू केली. अर्थात नामांकित गुंतवणूकदार अशा कंपन्यांपासून दूर का राहिले, असा प्रश्‍न आपल्याला पडला असेल. परंतु वॉरेन बफे आणि चार्ली मंगर म्हणतात, की जो व्यवसाय आपल्याला समजत नाही, त्यात गुंतवणूक करण्याचे आपण टाळतो. या उक्तीनुसार त्यांनी गुंतवणुकीच्या अनेक संधी गमावल्या आहेत, असे म्हणता येईल. गुंतवणुकीसाठी अब्जावधी रुपये असूनही त्यांनी गूगल, अॅमेझॉनसारख्या शेअरमध्ये कधीही पैसे टाकले नाहीत. अर्थात या कंपन्यांनी वीस टक्क्यापेक्षा अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. अर्थात संधी निघून केल्याने या दोघांनी कोणतिही खंत व्यक्त केलेली नाही. म्हणूनच ते आजही जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात.

समजणार्‍या व्यवसायातच गुंतवणूक हवी

वॉरेन बफे आणि चार्ली मंगर यांनी आतापर्यंत व्यवसायाची जाण झाल्यानंतरच संबंधित कंपनीत पैसा गुंतवला. म्हणूनच ते यशस्वी ठरले. गूगल आणि अमेझॉनमध्ये प्रारंभीच्या काळात गुंतवणुकीची संधी असतानाही ती गमावली. या भूमिकेमुळे त्यांचे कोट्यवधी रुपये वाचले. ते गुंतवणुकीच्या दृष्टीने कालांतराने जोखमीच्या ठरलेल्या पेटसडॉटकॉम, वेबवॅन, मायस्पेस आणि अनेक कंपन्यापासून वाचले. कारण या कंपन्या काही वर्षातच डबघाईला आल्या. वॉरेन बफेर्गावर माध्यमसम्राट रुपर्ट मर्डोक चालले नाही. मर्डोक यांनी 58 कोटी डॉलरमध्ये मायस्पेसची खरेदी केली. परंतु चार वर्षानंतर ही कंपनी अवघ्या साडेतीन कोटी डॉलरला विकावी लागली. अशा प्रकारचा तोट्याचा व्यवहार करताना मर्डोक यांनी बफे आणि मंगरपासून धडे घेतले नाहीत. बफेचे मार्गदर्शन घेतले असते तर ते नुकसानीपासून वाचले असते. न समजणार्‍या व्यवसायात त्यांनी उडी मारली आणि पायावर कुर्‍हाड मारून घेतली.

किचकटपणा नको

सामान्य नागरिकांनी देखील गुंतवणूक करताना काही खूणगाठ मनाशी बांधावी. जो व्यवसाय, धंदा कळत नाही, त्याकडे जाण्याचा धोका पत्करू नये. आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात आपल्या मनात काही भ्रामक कल्पना निर्माण झाल्या आहेत. जेवढी किचकट गुंतवणूक तेवढा फायदा अधिक, असा समज आहे. अर्थात पसर्नल फायनान्समध्ये अशा प्रकारचा विचार चुकीचा ठरतो.

बचत-गुंतवणुक सुटसुटीत हवी

वैयक्तिक पातळीवर गुंतवणूक करताना सुटसुटीतपणा असणे गरजेचे आहे. जर गुंतवणूकदार एखाद्या फायनान्शियल प्रॉडक्ट किंवा सेवेला समजून घेत नसेल तर तो संबंधित उत्पादनास पात्र आहे की नाही, हे कळणार नाही. विक्रेता हा प्रॉडक्टची तारीफ करत असला तरी ते उत्पादन फायदेशीर किंवा उपयुक्त ठरेलच असे नाही. म्हणूनच जागरुकता असणे गरजेचे आहे. जर आपल्या बचतीचा मोठा भाग गुंतवणुकीत टाकत असाल तर अशावेळी गुंतवणुकीचे गणित ठाऊक असणे आवश्यक आहे. कोणताही चाणाक्ष गुंतवणूकदार हा आपल्या सोयीने गुंतवणूक करत असतो. उदा. एखाद्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणूक पोर्टफोलिओत वीस प्रकारच्या गुंतवणूक असतील आणि त्यात वेगवेगळी रक्कम असेल तर अशा स्थितीत ती गुंतवणूक सोपी आणि सरळ वाटत असली तरी ती एकूणात किचकट राहू शकते. अशावेळी ती समजणे आवाक्याबाहेर राहू शकते.

लक्ष ठेवणे सोपे

प्रत्येक शंभरपैकी 99 गुंतवणूकदारांना काही वेगळे करण्यापेक्षा आपत्कालिन स्थितीसाठी एक निश्‍चित रक्कम तयार ठेवावी. टर्म इन्शूरन्सची पॉलिसी आणि तीन ते चार म्युच्युअल फंड यापेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. म्युच्युअल फंडच्या योजनेत एक करसवलत देणारी योजना देखील असू शकते. अशाप्रकारचे कॉम्बिनेशन हे साधे आणि सोपे राहते. यातून कोणालाही गुंतवणूकीचे गणित समजू शकते आणि त्यावर लक्ष ठेवणे देखील सोपे जाते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा