‘माता की चौकी’ कार्यक्रमाने माळीवाडा परिसरातील भाविक मंत्रमुग्ध

अहमदनगर- माळीवाडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त ‘माता की चौकी’ या कार्यक्रमाचे विनायक व जगदीश आंबेकर यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी यावेळी विनायक आंबेकर, जगदीश आंबेकर, मीना आंबेकर, बल्लू सचदेव, बाबासाहेब सुडके, बाबू कचरे आदि उपस्थित होते.

सर्वत्र नवरात्रोत्सवनिमित्त भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. माळीवाडा परिसरात आयोजित केलेल्या माता की चौकी कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. यावेळी बल्लू सचदेव यांनी देवी मातेची विविध गाणी गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये संगीतमय व भक्तीपूर्ण वातावरणात भाविक तल्लीन होऊन गेले होते.

यावेळी संगमनाथ महाराज म्हणाले, देवीच्या विविध रुपाची माहिमा यातून भाविकांना ऐकण्यास मिळाली आहे. त्यामुळे देवीच्या शक्ती, ममता, वात्सल्य अशा विविध रुपाचे दर्शनच भाविकांना झाले आहे. अशा धार्मिक कार्यक्रमामुळे मनुष्याला मन:शांती लाभते.