सावेडी उपनगरातील विविध समस्या सोडवा अन्यथा ‘मनसे’ स्टाईल आंदोलनाचा इशारा

अहमदनगर – महानगर पालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर हा सावेडी उपनगरातून प्राप्त होतो. तरीही त्या भागातील नागरी समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष होते आहे. उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, प्रोफेसर कॉलनी, श्रीराम चौक, रासने नगर यातील काही ठिकाणी पथदिवे बंद आहेत, रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालविणे तर दूरच पण पायी चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे. याबाबत प्रशासनातील अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रार करूनही दाखल घेतली जात नाही. नियमित कर भरणा करणार्‍या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. प्रशासनाने याची गंभीर दाखल घेऊन रस्ते आणि पथदिवे दुरुस्ती करावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

यावेळी मनसे उप शहराध्यक्ष तुषार हिरवे, अविनाश क्षेत्रे, अभिनय गायकवाड, सुनील धीवर, रतन गाडळकर, गणेश शिंदे, नितीन भुतारे आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा