जगातील प्रत्येक समस्येसाठी पालकच जबाबदार – कौशल्या ग्लोबल फाऊंडेशनचे रमेश परतानी

श्री माहेश्वरी युवक मंडळातर्फे स्नेहमिलन व रक्तदान शिबीर

अहमदनगर- आपला पाल्य कसा घडेल हे आपणच ठरवू शकतो. खरे तर जेव्हा मुल जन्म घेते तेव्हाच माता पित्याचा जन्म होतो. कारण माता पिता म्हणून ती त्यांचीही सुरवातच असते. जगातील प्रत्येक समस्येसाठी पालकच जबाबदार असून ते कशाप्रकारे मुलाला घडवितात त्यावर सर्व काही अवलंबून असते. पालकांनी मुलाला दिलेली शिकवण, संस्कार, मूल्ये यावर भविष्यात तो उत्तम नागरिक बनणार की नाही हे ठरते. कारण जन्मतः हा कोणी गुन्हेगार नसतो तर त्याला जे ज्ञान पालकांकडून मिळते त्यावरच तो घडत जातो, असे प्रतिपादन रमेश परतानी यांनी केले.

महेश नवमीचे औचित्य साधून माहेश्वरी युवक मंडळाने स्नेहमिलन रक्तदान आदी विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बडीसाजन ओसवाल मंगल कार्यालय येथे श्री माहेश्वरी युवक मंडळ अ.नगरच्यावतीने श्री.रामकृष्ण पतसंस्थेच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिर व महेश इंडस्ट्रीयल ग्रुप सहकार्याने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी सिकंदराबादचे कौशल्या ग्लोबल फौंडेशनचे रमेश परतानी यांच्या हस्ते भगवान महेश प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी स्वागताध्यक्ष अनुराग धूत, जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास असावा, माहेश्वरी प्रतिष्ठान अध्यक्ष श्रीगोपाल धूत, माहेश्वरी पंचट्रस्ट व रामकृष्ण पतसंस्था अध्यक्ष ओमप्रकाश चांडक, माहेश्वरी पंचायत सभा अध्यक्ष चंद्रकांत गट्टाणी, माहेश्वरी प्रदेश युवा प्रचारमंत्री किरण मणियार, माहेश्वरी युवाध्याक्ष अमित काबरा, राजस्थानी महिला मंडल जमनाबाई काबरा, राजस्थानी बहु मंडल सौ.सुरेखा मणियार, माहेश्वरी किशोरी मंडल कु.पूजा भुतडा, दीपक काबरा उपस्थित होते.

मुलांना बुद्धिमान बनविण्यासाठी वयाच्या सहा वर्षापर्यंतचा काळ सर्वोत्तम असून या काळात मुलांना विविध भाषा, शब्द उच्चार आदींचे ज्ञान सतत दिले पाहिजे. वय वर्ष पंधरापर्यंत मुलांच्या बुद्धिमतेचा विकास करता येतो. त्यामुळे शाळेतही त्याला उत्तम ज्ञान मिळेल त्यांसाठी पालकांनीही जागृत राहिले पाहिजे, असे श्री. परतानी म्हणाले.

आपण सर्व काही जाणतो ही भूमिका बर्‍याच पालकांची असते ती सोडून मुलाचे कौशल्य, त्याची क्षमता ओळखून त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात कसे जाता येईल याची जबाबदारी पालकांनी व शिक्षिकांनी घेतली पाहिजे. खरेतर आजच्या काळात पालकांनी मुलांशी कसे वागावे त्यांना कसे घडवावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज असून संस्कारित व देशासाठी सबल नागरिक घडवायचा असेल तर पालकांची भूमिका ही अधिक महत्त्वाची आहे याची जाणीव सर्व समाजाला झाली पाहिजे, असेही श्री. परतानी म्हणाले.

स्वागताध्यक्ष अनुराग धूत यांनी सर्वांचे स्वागत केले. दरवर्षी होणार्‍या विविध उपक्रमातून प्रेम व सद्भावना वाढत असून, युवकांना आपली जबाबदारीची जाणीव होत आहे. देशात अनेक समस्या असल्या तरी नव्या धोरणामुळे आयात कराव्या लागणार्‍या वस्तू देशात करण्यासाठी सध्या विविध सवलती उपलब्ध असून युवकांनी याचा फायदा घ्यावा, महेश इंडस्ट्रीयल ग्रुपतर्फे त्यांसाठी सर्वप्रकारे सहकार्य केले जाईल.

प्रास्ताविकात अध्यक्ष अमित काबरा यांनी महेश नवमीनिमित्त घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. रक्तदान शिबिराबरोबरच आयोजित चित्रकला, हस्ताक्षर, पोहणे, बॅडमिंटन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. रामासामाच्या माध्यमातून एकमेकांशी स्नेह वृद्धिंगत होत आहे. समाजाची वाटचाल नव्या दिशेने होत असून समाजातील ज्येष्ठांचे मौलिक मार्गदर्शन लाभल्याने सर्व उपक्रम अत्यंत व्यवस्थित पार पडत आहेत.

याप्रसंगी श्री रामकृष्ण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीगोपाल धूत, चंद्रकांत गट्टाणी, जमनाबाई काबरा यांनीही मार्गदर्शन केले. विशेष प्राविण्य मिळविलेल्याचा व गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस कु. पलक काबरा हिने गणेश वंदना सादर केली. सावेडी महिला मंडल यांनी शिव तांडव स्तोत्र सादर केले, भूषण मालू यांनी महेश वंदना सादर केली. सर्वात शेवटी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

याप्रसंगी रामकृष्ण पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. आनंदऋषी हॉस्पिटल व जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरात जवळजवळ 168 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सूत्रसंचालन सौ. शामा मंत्री व मुकुंद धूत यांनी केले. तर आभार शाम भुतडा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री माहेश्वरी युवक मंडळ रक्तदान संयोजक कमिटी संग्राम सारडा, आदित्य इंदाणी, महेश नवमी प्रकल्प प्रमुख महेश हेडा, गणेश लढ्ढा, गोविंद जाखोटिया, विशाल झंवर, मनिष सोमाणी, किरण मणियार तसेच स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी गोविंद दरक, गोविंद मणियार, अनिकेत बलदवा, अमित जाखोटिया, पवन बिहाणी, अतुल डागा, पवन बंग, गोविंद सोमाणी, संकेत मानधना, मुकुंद जाखोटिया, शेखर आसावा, योगेश बजाज व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी रामकृष्ण पतसंस्थेचे सर्व संचालक, मोहनलाल मानधना, जितेंद्र बिहाणी, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर, किसन बंग, श्रीगोपाल जाखोटिया, श्रीकांत काकानी, पुरुषोत्तम मानधना, श्रीगोपाल सोनी, रवी काबरा, मुकेश पल्लोड आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा