आदर्श लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने प्रा.डॉ. माहेश्वरी गावित यांचा सन्मान

अहमदनगर- आदिवासी साहित्य, लोकसाहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक आणि विचारवंत प्रा.डॉ. माहेश्वरी गावित यांना पाथर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मौलिक योगदानासाठी आदर्श लोकमाता अहिल्यादेवी होळकर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नामदेवराव ठोंबरे, दिगंबर सोलाट यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. प्रा.डॉ. संतोष तागड, छगन पानसरे यावेळी उपस्थित होते.

प्रा.डॉ. माहेश्वरी गावित या पेमराज सारडा महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्राच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्य व समाज क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना आदिवासी समाजभूषण पुरस्कार, विशेष अभ्यासक पुरस्कार, डॉ. गोविंद गारे संशोधन पुरस्कार, जनसारस्वत सुदाम सावरकर स्मृती सन्मान, अंकुर साहित्य संघाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, शब्दांगण पुरस्कार, वाङ्मयसेवा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार, ‘आदिवासी साहित्यविचार’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा 2009 चा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविले आहे.

त्यांची आतापर्यंत 22 च्या वर ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. त्यांचे अनेक ग्रंथ अनेक विद्यापीठांत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून लावलेले आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा