महावितरण कार्यालयात दशक्रिया विधी; माजी महापौरासह 30 जणांवर गुन्हा

अहमदनगर – श्रीगोंद्यातील संदेश आढाव याच्या मृत्युचा दशक्रिया विधी महावितरण कार्यालयाच्या आवारात केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह 25-30 जणाविरुद्ध सोमवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या संदेश आढाव (वय 17) याचा शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरण कर्मचार्‍यांच्या गलथानपणाचा निषेध करीत आढाव कुटुंबियांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दशक्रिया विधी केला.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, माजी महापौर अभिषेक कळमकर, हभप अजय महाराज बारस्कर, संतोष भाऊ पवार, अजित धस, प्रकाश बेरड, श्रीकृष्ण खामकर यांच्या 25-30 जणांनी जिल्हाधिकारी नगर यांच्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करुन संदेश आढाव याच्या मृत्युप्रकरणी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचेवर कायदेशिर कारवाई करावी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी या मागणीकरीता मृत संदेश आढाव याचा दशक्रिया विधी केल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन गोरे यांच्या फिर्यादीवरुन भादविक 143, 147, 148, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक भागवत हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा