महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू ; राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

मुंबई: भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही राज्यात सत्तेचा दावा करण्यात अपयश आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. राज्यपालांनी तसं पत्रंच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं. केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारसीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला २० दिवस उलटले तरी कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यात यश आलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसलाही आज रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी राज्यपालांना फोन करून सत्तेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. राष्ट्रवादी संख्याबळ जुळवण्यात असमर्थ असल्याचंही अजित पवार यांनी राज्यपालांना म्हटलं होतं. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राज्यपालांनी संविधानाच्या कलम ३५६ नुसार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. संविधानाच्या कलम ३५६ नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. राज्यपाल कोश्यारी यांच्या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली आली आहे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा