लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लायन्स प्राईडचा पदग्रहण सोहळा थाटात

आनंद बोरा व कमलेश चुत्तर यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सुत्रे

अहमदनगर- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लायन्स प्राईडचा संयुक्त पदग्रहण सोहळा उपप्रांतपाल अभय शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. क्लबचे नुतन अध्यक्ष आनंद बोरा आणि कमलेश चुत्तर यांना पदाची सुत्रे प्रदान करण्यात आली.

हॉटेल सिंग रेसीडेन्सीमध्ये झालेल्या पदग्रहण सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रांतीय अध्यक्ष हरजीतसिंग वधवा, प्रवीण गुलाटी, विभागीय अध्यक्ष दिलीप कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नुतन अध्यक्ष बोरा यांनी 2019-20 या कार्यकाळात भरीव सामाजिक कार्य उभे करण्याची आशा व्यक्त केली. शहरात मेडिकल एड लायब्ररीचे विस्तार, आरोग्य शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान मोहिम, दिवाळी मेळा, आर्थिक दुर्बलघटकांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे जाहिर केले. प्राईडचे अध्यक्ष चुत्तर यांनी शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सक्रीयपणे स्वच्छता मोहिमेचा संकल्प केला. तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले.

उपप्रांतपाल शास्त्री यांनी लायन्सने वंचितांसाठी सामाजिक चळवळ उभी केली असून, याचा फायदा वंचित घटकांना झाला आहे. वंचितांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम लायन्स करीत असल्याचे सांगून, नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देत विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर मागील कार्यकारिणीने केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. प्रविण गुलाटी यांनी नव्याने क्लबमध्ये दाखल झालेल्या सदस्यांना लायन्स क्लबची ध्येय धोरणे सांगून शपथ दिली.

लायन्स क्लबचे मावळते अध्यक्ष हरजीतसिंह वधवा यांनी त्यांच्या कारकिर्दीत राबविलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सादर करुन, सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. प्राईडचे मावळते अध्यक्ष नरेंद्र बोठे यांनी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे नवनिर्वाचित सचिव सुमित लोढा, खजिनदार सतीश बजाज, लायन्स प्राईडचे सचिव अभिजीत भळगट, खजिनदार सनी वधवा यांनी पदभार स्विकारला. मावळते पधादिकारी संदेश कटारिया, गगनकौर वधवा, डॉ.नेहा जाजू यांनी नवीन पदाधिकार्‍यांना पदाची सुत्रे देत सर्व सदस्यांनी दिलेल्या सहयोगाबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी रवींद्र शितोळे, एल अॅण्ड टी कंपनीचे अरविंद पारगावकर, डॉ. एस. एस. दीपक, शरद मुनोत, देवेंद्रसिंह वधवा, छाया राजपूत, महेश पाटील, हरीश हरवाणी, विजय माळी, हेमलता बरमेचा, संतोष माणकेश्‍वर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नेहा जाजू व प्रिती शाह यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत मनयोगमाखिजा यांनी केले. आभार अश्‍विनी भंडारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय भंडारे, किरण भंडारी, सुनील छाजेड, कमलेश भंडारी, डॉ. अमित बडवे, योगेश भंडारी, राजू संधू, प्रशांत मुनोत, डॉ. दीपाली भळगट, अभिजीत लुनिया, हरमीतकौर माखिजा, सिमरनकौर वधवा, बलजितसिंह बिलरा, नरेश मुनोत, सहेजकौर वधवा, विपुल शाह, नीलम परदेशी यांनी परिश्रम घेतले.