कहाणी गुप्त ग्रंथालयाची

माणसाला केवळ शरीराची भूक भेडसावत नाही. अंतराळवेध प्राचीन काळापासून माणसाला ज्ञानाचीही भूक भेडसावत आलेली आहे आणि ही भूक पुस्तकांमुळे शमते. अशा ग्रंथांचा संग्रह ही काही आधुनिक काळातीलच पद्धत नाही. भारतात तर नालंदा विद्यापीठातील ग्रंथालय इतके समृद्ध होते की परकीय आक्रमणानंतर ते जाळल्यावर त्याची आग पुढे सहा महिने धुसमत होती असे म्हटले जाते. जगातील अनेक देशांमध्ये काही गुप्त ग्रंथालयेही आहेत. तिथे शेकडो वर्षांपूर्वीचे ग्रंथ जतन करून ठेवलेले आहेत.

सीरियामध्ये चार वर्षांपूर्वी राजधानी दमिश्कच्या जवळ दारेया येथील वेढ्यावेळी लोकांनी सुमारे 14 हजार ग्रंथांचे बॉम्बहल्यांपासून संरक्षण केले. हे ग्रंथ दारेयामधील लोकांनी एका गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले होते. तेथून हे हलवून नव्या गुप्त ठिकाणी नेण्यात आले. सन 1900 मध्ये चीनच्या दानहुंगजवळ एक गुहा आढळून आली. ही गुहा सुमारे एक हजार वर्षे बंद होती असे म्हटले जाते. तिथे अकराव्या शतकरातील हस्तलिखित ग्रंथ आढळून आले. ज्यावेळी स्थानिक अधिकार्‍यांना त्याची माहिती देण्यात आली त्यावेळी त्यांनी याबाबत फारसा रस दाखवला नाही.

या गुहेचा शोध लावणार्‍या वांग युआनलू या साधूने तेथील ग्रंथांची जबाबदारी घेतली. कालांतराने हंगेरीच्या ऑरेल स्टीन यांनी थेतील सुमारे दहा हजार हस्तलिखिते विकत घेतली. रशिया, फ्रान्स आणि जपानच्या लोकांनीही थेतील काही ग्रंथ नेले. अखेर 1910 मध्ये चीनच्या सत्ताधीशांना जाग आली आणि त्यांनी ही हस्तलिखीते परत करावीत असे म्हटले. मात्र, तोपर्यंत 80 टक्के हस्तलिखिते दुसर्‍या देशांमध्ये गेली होती. तेथील ग्रंथांमध्ये ग्रह-तार्‍यांवर आधारित कॅलेंडरच्या उत्पत्तीसह अन्यही अनेक बाबींची पुरातन माहिती आहे.