10 जानेवारीपासून समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला

भिंगार – स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्यावतीने 10 ते 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद समाज प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रमोद मुळे यांनी केले आहे.

भिंगार व परिसरात गेली 23 वर्षांपासून विविध सामाजिक शैक्षणिक व सेवा विषयक उपक्रम राबविणार्‍या या संस्थेच्यावतीने समाज प्रबोधनपर विविध विषयांवर नामवंत व्याख्यात्यांचे व्याख्यानांचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षी देखील पुढीलप्रमाणे व्याख्याने होणार आहेत. 10 जानेवारी रोजी रवींद्र गणेश तथा राजाभाऊ मुळे (नगर) विषय-राष्ट्रवादकाल, आज व उद्या 11 जानेवारी रोजी संजय सुधाकर साळवे (नाशिक) विषय – महापुरुषांचे कार्यातून सामाजिक समरसतेची वाटचाल.

12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती दिनी – ज्ञानेश पुरंदरे (पुणे) विषय- स्वामी विवेकानंद विचारात समर्थ सशक्त भारत आदी व्याख्याने रोज सायंकाळी 7:30 वाजता ब्राह्मण गल्लीतील एकबोटे महाराज श्रीराम मंदिर येथे होणार आहे.

व्याख्यानापूर्वी पाच मिनिटे आगोदर उपस्थित राहावे.