करोडपतींचे ‘देशछोडो’

परदेशात जाण्याची इच्छा असणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच दरवर्षी परदेशात जाणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे. देशातील सक्षम, कर्तृत्ववान आणि कौशल्य असलेले विद्यार्थी परदेशात गेल्याने देशाचे मोठे नुकसान होते. तसेच नोकरीसाठी बाहेर जाणार्‍यांमुळे देशाला गरज असलेले कुशल मनुष्यबळ इतर देशांकडे जाते. देशातील हे ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी अशा तरुणांना देशातच त्यांच्या क्षेत्रातील संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे.

अफरासिया बँक आणि खर्म न्यू वर्ल्ड वेल्थकडून करण्यात आलेल्या ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू 2019 या अहवालात गेल्या वर्षभरात श्रीमंत भारतीय देशाबाहेर जाण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. करोडपती आणि देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी 5000 जणांनी देश सोडल्याचे अहवालात म्हटले आहे. 2017 पर्यंत देश सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक होणार्‍यांचे प्रमाण जास्त होते.

मात्र, सध्या ब्रक्झिटमुळे तेथे अनिश्चततेचे वातावरण असल्याने तेथे जाणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. चीन आणि रशियातील नागरिकही मोठ्या प्रमाणात देश सोडत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. देशाबाहेर पडून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात.

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसीत होत असली तरी देशातील असमानता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अर्धी संपत्ती करोडपती किंवा अतिश्रीमंत लोकांच्या हाताताच केंद्रीत झाली आहे. त्यामुळे सुखासीन जीवनशैलीसाठी अतिश्रीमंत देशाबाहेर पडत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा