लक्ष्मणराव ताठे यांचे वृद्धापकाळाने निधन

जून्या पिढीतील कांदा-बटाट्याचे व्यापार

अहमदनगर – मार्केटयार्डमधील जुन्या पिढीतील कांदा-बटाटा व्यापारी लक्ष्मणराव भाऊराव ताठे (वय 90, रा.गोदावरी सदन, गणेश चौक, भुतकरवाडी, नगर) यांचे मंगळवारी (दि.20) सकाळी 10.15 वा. वृद्धापकाळाने निधन झाले.

मार्केटयार्डमध्ये त्यांचा कांदा-बटाट्याचा व्यवसाय होता. त्यांनी मोठ्या कष्टातून प्रगती केली. पूर्वी ते माळीवाडा विशाल गणेश मंदिराजवळ रहात असत. ते शांत, मनमिळावू स्वभावाचे म्हणून सर्वांना परिचित होते.

त्यांच्या पश्‍चात नितीन व गणेश ही 2 मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 5 नंतर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा