लळीत रंगभूमीतर्फे पारंपारिक आदिवासी धून कार्यशाळा

अहमदनगर- लळीत रंगभूमी, पुणेने ‘पारंपारिक आदिवासी धून (संगीत)’ कार्यशाळेचे पुण्यात आयोजन केले आहे.

या कार्यशाळेत ताल, तंतू, वायू, अवरोध्य प्रकारातील सोलो वादकांचा समावेश केला जाणार आहे. यात प्रमुख्याने कहाळी, तूट, घांगळी (झांगळी), तारपा, पावरी, ढोल, डाका, किंगरी, बना, मांदळ, ढोलकी, झांज, तुतड्या बिरी, पावा, शहनाई इ. सोलो वादकांचा समावेश केला जाणार आहे.

कलावंतांनी लळित रंगभूमी, 24/599 पावन सहकारी हौसिंग सोसायटी, गोखलेनगर, पुणे-411016 फोन 020-25650625, मोबा.9422318818 वर 26 ऑक्टोबरपर्यंत संपर्क करावा.