मुखविलास लाडू

साहित्य- 3 वाट्या हरभरा डाळ, 3 कप दूध, दीड ते 2 वाट्या साजूक तूप, दीड वाटी खवा, अर्धी वाटी काजू-बेदाणे, 1 लहान चमचा जाडसर कुटलेली वेलदोडा पूड, 4 वाट्या साखर, पाव चमचा केशर.

कृति – हरभरा डाळ स्वच्छ धुवून दुधात भिजत घालावी. 4 तासानंतर मिक्सरवर वाटून घ्यावी. कढईत तूप तापवून मंद आचेवर वाटलेली डाळ मोकळी होईपर्यंत परतावी. गुलाबीसर झाली आणि तूप सुटू लागले की काढून घेऊन खवा परतावा. डाळ, खवा, काजू आणि बेदाणे एकत्र करावे.

नंतर साखरेत 1 वाटी पाणी घालून 3 तारी पाक करावा. खाली उतरवून त्यात केशर-वेलदोडा आणि एकत्र केलेले साहित्य घालून मिश्रण आळल की लाडू वळावे. हे लाडू जरा ओलसर असतात. त्यामुळे जेवणात पक्वान्न म्हणून चांगले लागतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा