लाचखोर चौकडीच्या पोलिस कोठडीत वाढ

अहमदनगर – नाशिक अनुसचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक रामचंद्र सोनकवडे व विधी अधिकारी शिवप्रसाद काकडे यांच्यासह अन्य दोघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने वाढ केली असुन चौघांना बुधवार (दि.11) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. रामचंद्र रतिलाल सोनकवडे, शिवप्रसाद मुकुंद काकडे, विनायक उर्फ सचिन उत्तम महाजन, मच्छिंद्र मारूती गायकवाड यांच्याविरूध्द दि.5 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली. त्याबाबत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असुन विशेष न्यायालय कोपरगाव न्यायालयाने तपासकामी चौघांना 9 सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ केली.