कुलकर्णी हॉस्पिटल अॅण्ड पिनॅकल डेंटल केअर 9 ऑगस्टपासून रुग्णसेवेत

अहमदनगर- नगरमधील जुन्या कोर्ट परिसरातील जुन्या निसळ हॉस्पिटल येथील कुलकर्णी हॉस्पिटल व पिनॅकल डेंटल केअर शुक्रवार 9 ऑगस्टपासून रुग्णसेवेत रूजू होत आहे. कन्स्लटिंग फिजिशियन डॉ. पुष्कराज कुलकर्णी व दंतरोग तज्ज्ञ डॉ.प्रियंका कुलकर्णी या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना उच्च दर्जाची व परिणामकारक आरोग्यसेवा देणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व आधुनिक वैद्यकीय सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या हॉस्पिटलच्या सेवेचा रुग्णांना चांगला लाभ होणार आहे.

डॉ.पुष्कराज कुलकर्णी यांनी पुण्यातून एम.डी.ची पदवी घेतली असून चार वर्षांपासून ते पुण्यातच परिक्षित क्लिनिकद्वारे प्रॅक्टिस करीत आहेत. राहुरीतील कै.परिक्षित कुलकर्णी एज्युकेशन एज्युकेशन सोसायटीद्वारे ते शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारुन त्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी ते प्रयत्न करतात.

त्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग, दमा उपचार, संधीवात, आमवात, पोटाचे विकार, रक्तविकार ट्रिटमेंट, मानसिक ताणतणाव, स्थौल्य (लठ्ठपणा), त्वचा विकार, चिकन गुणिया, स्वाईन फ्लू, संधीवात, विषबाधा, श्वसनाचे विकार, पल्स ऑक्सीमीटर, इ.सी. जी., ग्लुकोमीटर, नेब्युलाईजर, ऑक्सिजन सुविधा, पंचकर्म सुविधा उपलब्ध असून मधुमेहावरील सर्वांगीण उपचार केंद्र याठिकाणी आहे.

हॉस्पिटलमधील पिनॅकल डेंटल सेंटर हा स्वतंत्र विभाग एम.डी. एस.पदवी असलेल्या दंतरोग तज्ज्ञ डॉ.प्रियंका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार आहे. डॉ.प्रियंका यांनी एम.डी.एस.पदवी बडोदा येथून घेतली असून त्या तीन वर्षांपासून पुण्यातच प्रॅक्टिस करतात. दंत व मौखिक आरोग्यबाबत त्यांनी अनेक शाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. डेंटल हायजिनवरही त्यांनी लेक्चर दिलेली आहेत.

पिनॅकल डेंटल केअरमध्ये रूट कॅनल ट्रिटमेंट, किडलेल्या, खराब झालेल्या दातांवरील उपचार, ओपन अपेक्स, मेटल कॅप, सिरॅमिक कॅप बसवणे, दातांची कवळी बसवणे, दात साफ करणे, दातात सिमेंट भरणे आदींसह दंतोपचारावरील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

हॉस्पिटलमध्ये अॅडमिटची सुविधा असून बेडसाईड कार्डियाक मॉनिटर्स, जनरल वार्ड, स्पेशल रूम्स, प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी, उच्च प्रतीची तत्पर वैद्यकीय सेवा, मेडिकल सुविधा, पॅथॉलॉजीकल सहाय्य हॉस्पिटलचे वैशिष्ट्ये आहे. माहितीसाठी 9307626582.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा