क्रीडा संघटनांचे आरोप बिनबुडाचे; वेठीस धरण्याचा प्रयत्न; क्रीडाधिकारी

अहमदनगर- जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी आपल्याकडे कधीही कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही किंवा लेखी मागणी केलेली नाही. जे आरोप केले जात आहेत, ते सर्व बिनबुडाचे आहेत. एका महिला क्रीडा अधिकार्‍याला वेठीस धरण्याचा प्रकार असावा, अशी शक्यता निर्माण झाली आहे. खेळाडूंचे हित क्रीडा संघटनाकडून पाहिले जात नाही. समितीने कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार केला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

क्रीडा अधिकारी नावंदे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही व्यवस्था लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. कोणीही क्रीडांगणामध्ये येऊ नये म्हणून आम्ही मासिक शुल्क घेत असून खेळाडूंना पन्नास रुपये तर नागरिकांना शंभर रुपये असे शुल्क ठेवलेले आहे. ज्या संघटना वेगवेगळ्या प्रकारचे कोचिंग क्लास घेतात ते खेळाडूंकडून मानधन घेतात. मग त्यांना रक्कम भरण्यास काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ज्या संघटना असहकार आंदोलन करत आहेत, त्यांनी आपल्याकडे कधीच लेखी अथवा तोंडी स्वरूपाचे म्हणणे मांडले नव्हते. त्यामुळे त्यांची भूमिका आपल्याला कधीच समजू शकलेला नाही. उलट प्रसारमाध्यमांकडे जाऊन त्यांनी या सगळ्या भूमिका मांडल्या आहेत. याअगोदर सुद्धा अशाप्रकारच्या भूमिका या संघटनांनी घेतल्या होत्या. त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचा विषय आपल्या समोर आलेला आहे. एकप्रकारे अधिकार्‍याला बदनाम करण्याचा प्रकार होत आहे. नेमके माझे काय चुकले? मी जर एखाद्या विषयाला शिस्त लावली, तर एवढा विषय निघायचा काय प्रकार आहे. हे मला अद्यापही कळू शकले नाही. क्रीडा संकुलाचा दुरुस्तीचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर आहे. याकरता मोठा निधी पण लागला आहे. विशेष म्हणजे देखभाल दुरुस्तीसाठी आम्ही 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव 31 जुलै रोजी आमच्या क्रीडा महासंचालकांकडे सादर केलेला आहे. यामध्ये टेबल दुरुस्तीसह फुटबॉलचे मैदान तयार करणे, हॉकीचे मैदान तयार करणे, स्वच्छतागृह यांची देखभाल दुरुस्ती करणे आदी प्रस्तावित आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा