खांडवी

साहित्य – 1 वाटी तांदळाचा रवा, 1 वाटी साखर किंवा गूळ, आले कीस 2, 3 चमचे, 2 वाट्या नारळाचे दूध, पाव चमचा वेलदोड्यांची पूड, तूप, चिमूटभर मीठ, थोडा रोझ इसेन्स किंवा गुलाबपाणी.

कृती – तांदूळ धुऊन कपड्यावर पसरून वाळवावे. नंतर त्यांचा रवा काढावा. तुपावर रवा चांगला भाजून घ्यावा. नारळाच्या दुधात साखर विरघळून घ्यावी. दुधाला उकळी आली की त्यात वाटलेले आले, मीठ व भाजलेला रवा घालावा.

इसेन्स व वेलदोड्यांची पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेवावे. गॅस मंद ठेवावा. नंतर बाजूने थोडे तूप सोडून ढवळावे व तूप लावलेल्या थाळीत घालून थापावे. वरून थोडे ओले खोबरे घालून थापावे. गार झाल्यावर मोठ्या वड्या पाडाव्यात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा