केडगावला श्री संत ह.भ.प. वामनभाऊ महाराज व राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम

अहमदनगर- केडगाव येथील श्री संत हभप वामनभाऊ महाराज व हभप भगवानबाबा सेवा मंडळाच्यावतीने वामनभाऊ महाराज व भगवानबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन श्री संत भगवानबाबा व वामनभाऊ मंदिर, सुचेतानगर, भूषणनगर, केडगावदेवी, नगर याठिकाणी करण्यात आले आहे.

यानिमित्त शनिवार, 11 जानेवारी रोजी ह.भ.प. भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 8 ते 10 वा वेळेत बाबांच्या मूर्तीस महाअभिषेक व होमहवन होईल. 10 ते दु. 2 यावेळेत केडगाव परिसरातील भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम होईल. दु 4 ते 5 यावेळेत ह.भ.प. वासुदेव महाराज खेडकर यांचे प्रवचन होईल. त्यानंतर सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल.

शुक्रवार, 17 जानेवारी रोजी ह.भ.प. वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 8 ते 10 वा वेळेत बाबांच्या मूर्तीस महाअभिषेक व होमहवन होईल. स. 10 ते दु. 2 यावेळेत केडगाव परिसरातील भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 4 ते 5 यावेळेत हभप दिलीपमहाराज निंबाळकर यांचे प्रवचन होईल. त्यानंतर सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल.

शनिवार, 18 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 6 यावेळेत ह.भ.प. छगन महाराज (श्री क्षेत्र, बाळनाथ गड) यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर सायंकाळी 6 ते 8 यावेळेत महाप्रसादाचा लाभ दिला जाईल. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा, भजनाचा व प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो. नं. 9325108057 वर संपर्क साधावा.