स्वातंत्र्यदिनी कवडे प्रशालेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम

अहमदनगर – स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरदेवळे येथील स्वा. सै.जानकीबाई कवडे प्रशालेत 15 रोजी सकाळी 8 वा. जावेद शेख (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर) यांच्या हस्ते व भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

पारितोषिक वितरण उद्योगपती अमर तलरेजा व अक्षय भटेवरा यांच्या उपस्थितीत व प्रा.आर.टी.वामन, सय्यद शौकत अली यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे डॉ. रविंद्र कवडे, सौ.राज कवडे, मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर आदींनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा