काकडी कटलेट

साहित्य – 1 काकडी, 1 वाटी हरभरा डाळ, 2 चमचे बेसन, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा पेला कोथिंबीर, अर्धा चमचा हिंग, मीठ, गरम मसाला, तेल.

कृती – काकडी किसून थोडा वेळ ठेवा. नंतर दाबून त्यातील पाणी काढून टाका. हरभरा डाळ 4 तास भिजत ठेवून वाटून घ्या. त्यात 2 चमचे बेसन मिसळून मीठ, हिंग, गरम मसाला, बारीक चिरलेला कांदा व काकडी मिसळून पेस्ट बनवा. आता कढईत तेल गरम करून हव्या त्या आकारात कटलेट बनवून मंद आचेवर तळून घ्या.