कर्तारपूर येथे 9 नोव्हेंबरपासून सुरु होणार्‍या कार्यक्रमात 10 हजार सिंधी भाविक सहभागी होणार

अहमदनगर – गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या वर्षानिमित्त संपूर्ण विश्वात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. मागील एक वर्षापासून सीख, पंजाबी, सिंधी समाज यांच्यावतीने अनेक धार्मिक सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम हाती घेतलेले आहेत. गुरूनानक देवजी यांच्या संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात करिता पाकिस्तान येथून निघालेली आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन तसेच भारतातील पंजा साहेब म्हणून ओळख असलेले कर्नाटक येथील बिदर साहेब येथील गुरुद्वारा येथून निघालेली यात्रा, मनमाड येथील ऐतिहासिक गुप्तसर गुरुद्वारा येथून देखील निघालेली यात्रा हे सर्व या 550 वर्षानिमित्त होणारे उत्सव आहेत. कर्तारपूर कॉरिडोर हेदेखील गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या वर्षानिमित्त उद्घाटन होत आहे. एक संदेश अनेक लोकांच्या मनात गेलेला आहे की भारत आणि पाकिस्तान जरी मोठे शत्रू असले तरी गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या वर्षानिमित्त फाळणीनंतर प्रथमच कुठेतरी भारत पाकिस्तान एकत्रित येण्याचे एक पाऊल दोन्ही देशांकडून घेतलेले दिसते. 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर कर्तारपूर साहेब येथे मोठे कार्यक्रम आहे व त्यात भारतातील सुमारे दहा हजार नागरिक राजकीय पुढारी आणि त्याचबरोबर अनेक देशातील पंजाबी सिंधी भाविक देखील सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांमधील तणाव असताना देखील 31 ऑक्टोबर, 5 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबरला सुमारे पाच हजार लोक पाकिस्तान येथील ऐतिहासिक गुरुद्वार यांना भेट देण्याकरिता व्हिसा देण्यात आलेले आहे. हा लिमिटेड विसा ज्या ठिकाणी ऐतिहासिक गुरुद्वारे आहेत अश्या फक्त सात शहरांत करिता देण्यात आलेले आहे. भारतातील पंजाब प्रांतातील सुलतानपूर लोधी या ठिकाणी देखील अनेक महिन्यांपासून कार्यक्रम सुरू आहेत. अमृतसर, बिदर, दिल्ली, पटना साहेब, नांदेड, आनंदपुर साहेब, याव्यतिरिक्त भारतातील सर्वच शहरात गुरूनानक देवजी यांचे पाचशे पन्नास वर्ष उत्साह आणि धूम धडाक्यात साजरी करण्यात येत आहे. सगळ्यांसाठी भला मागणारे, प्रार्थना करणारे गुरू नानक देवजी यांनी शिकविले आहे की, अर्दासनंतर सर्व शीखपंजाबी बांधव नेहमीच म्हणतात, नानक नाम चर्डी कला तेरे भाने सर्बत दा भाला. अर्थ गुरुनानक जी आपल्या नावातच यश प्राप्त होण्याची कला आहे आणि तुझ्या नावानेच सर्वांचं भला-चांगभलं होईल ही आरदास सर्व सीख पंजाबी सिंधी भाऊ-बहीण करतात. 12 नोव्हेंबरला येणारे ऐतिहासिक परवाच्या निमित्त सर्व बांधवांना आणि बघिनिणा लाख लाख शुभेच्छा.

अहमदनगर जिल्ह्यात देखील अहमदनगर येथील 15 गुरुद्वारा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, संगमनेर, नेवासा, शेवगाव, राहता, श्रीगोंदा आदी ठिकाणी अखंड पाठ साहेब आरंभ झाले आहेत. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहेत. आज 550 व्य वर्षी एकतेचे आणि सर्व एक असल्याचे संदेश देणारे श्री गुरु नानक देवजी यांचे संदेश संपूर्ण विश्वात पोहोचले आहेत, त्यांनी सुरू केलेले लंगर आज ही सीख समजाची ओळख झाली आहे, अशी माहिती हरजितसिंग वधवा (मोबा.9423162727) यांनी दिली.