कार्ड क्लोनिंगने फसवणूक झालीय?

एटीएम कार्डची क्लोनिंग करताना हॅकर हे एटीएम, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या क्लोनिंगसाठी मशिनमध्ये स्किमर बसवतात. हे स्किमर मशिन स्वाइप किंवा एटीएम मशिनला अगोदरच ङ्गिट करून ठेवतात. त्यानुसार आपण कार्ड स्वाइप किंवा एटीएम मशिनचा वापर केला की, कार्डची संपूर्ण माहिती या मशिनमध्ये कॉपी होते. त्यानंतर हॅकर आपल्या कार्डची संपूर्ण माहिती संगणक आणि अन्य मार्गाने रिकाम्या कार्डमध्ये इन्स्टॉल करतात. त्यानुसार कार्डचे क्लोन तयार होते. त्याचा वापर करून हॅकर अन्य ठिकाणावरून पैसा काढतात.

याप्रमाणे हॅकर लाखो कार्डधारकांची लाखो रुपयांची फसवणूक करतात. एटीएममध्ये अशी बसवतात मशिन अनेक एटीएम मशिनमध्ये हॅकर स्किमर मशिन बसवताना पुढील कृती करतात. त्यात किपॅडवर एक मेटच्या पद्धतीप्रमाणे उपकरण असते तसेच स्वाइपच्या ठिकाणी कॉपी मशिन आणि पासवर्ड पाहण्यासाठी एक बटणसारखा कॅमेरा बसवलेला असतो. या मशिनमध्ये जेवढे एटीएम स्वाइप होतात, त्या सर्व कार्डचा डेटा एकत्र जमा होतो. याप्रमाणे एटीएम कार्डची क्लोनिंग करून फसवणूक केली जाते. क्लोनिंगपासून बचाव कसा करावा आपल्या खात्याला मोबाईल नंबर जोडलेला असल्याने व्यवहार होताच त्याचा एसएमएस आपल्याला मिळतो.

जर आपण व्यवहार केलेला नसेल तर तात्काळ बँकेला फोन करून संबंधित व्यवहाराची माहिती द्या आणि कार्ड ब्लॉक करा. तसेच फसवणुकीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करून बँकेकडे तक्रारीची प्रत सादर करा. याशिवाय ज्या एटीएम मशिनमधून बेकायदा व्यवहार झाला आहे, त्या मशिनचे व्हीडिओ फुटेज तपासा. जेणेकरून संशयित व्यक्तीचा शोध घेणे सोपे जाईल. मोबाईलच्या प्रत्येक एसएमएसवर लक्ष ठेवा. जर आपण सजग राहिलो तरच आपला पैसा सुरक्षित राहिल. याशिवाय ठराविक काळानंतरच पासवर्ड बदलत राहा.

लक्षात राहत नसेल तर नियमित वापरण्यात येणार्‍या डायरीवर त्याची नोंद करा. एटीएमध्ये पैसे काढताना आपल्याव्यतिरिक्त अन्य कोणीही नाही, याची खातरजमा करा. तसेच आपले डेबिट कार्ड अन्य व्यक्तीला देऊ नका. बँक डिटेल्स फोनवरून कधीही शेअर करू नका. बँक आपल्याला कधीही एटीएम पिनची विचारणा करत नाही. तसेच अनोळखी फोनवरूनही बँक डिटेल्स देऊ नका.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा