कपिल देव यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. 23 वर्षीय आमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. ‘८३’च्या भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा हा सिनेमा असेल. दिग्दर्शक कबीर खान हा सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.
या सिनेमात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता साकारणार आहे. तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. तसेच सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत ताहिर भसीन दिसणार आहे.