डॉ. कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल पुण्यात पहिले तर भारतात पहिल्या दहात

पुणे- अखिल भारतीय टाईम्स् ग्रुपने संपूर्ण भारताचे सर्वेक्षण केले असता त्यामध्ये नेत्रउपचारामध्ये पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटलची पुण्यातील सर्वात चांगले हॉस्पिटल म्हणून निवड करण्यात आली तर अतिशय अल्पावधीत त्यांची भारतातील सर्वोत्कृष्ट नेत्ररूग्णालय म्हणून पहिल्या दहा संस्थामध्ये (8 वे) निवड करण्यात आली आहे.

पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटलची उभारणी डॉ. वर्धमान व डॉ. सौ. श्रुतिका कांकरिया ह्यांनी सुमारे 5 वर्षापूर्वी केली. चेन्नईच्या शंकर नेत्रालयात डोळ्यांच्या शास्त्राचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘ग्रीस’ येथील विश्वप्रसिध्द डॉ. आयोनीस पॅलिकॅरीस यांच्याकडे लेसर नेत्रशस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेणारे डॉ. वर्धमान भारतातील पहिले व एकमेव नेत्रतज्ञ आहेत. पुढे त्यांनी व डॉ. सौ. श्रुतिका ह्यांनी अमेरिकेतील सर्वात चांगल्या बास्कम पाल्मर ह्या डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रदिर्घ अनुभव घेतल्यानंतर भारतात परत येण्याचा संकल्प केला व पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल समोर ‘एशियन आय हॉस्पिटलची उभारणी केली.’

जगातील सर्वात अत्याधुनिक उपचारपध्दती व उपकरणे ह्यांनी ते नेत्ररूग्णालय सज्ज असून त्यांच्या समवेत 10-12 नेत्रतज्ञांची टीम कार्यरत आहे. आज संपूर्ण भारतातून व परदेशातूनही नेत्ररूग्ण उपचारासाठी एशियन आय हॉस्पिटल येथे मोठ्या विश्वासाने येत आहेत. डॉ. कांकरियांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.