सारोळा कासारचे माजी सरपंच भाऊसाहेब काळे यांचे निधन

अहमदनगर – नगर तालुक्यातील सारोळा कासार गावचे जुन्या पिढीतील माजी सरपंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि शेतकरी हितासाठी नेहमीच संघर्ष करणारे शेतकरी संघटनेचे नेते, गावातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व भाऊसाहेब विठ्ठल काळे (वय 89) यांचे बुधवारी (दि.6) वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात 6 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जुन्या पिढीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे कार्यकर्ते असलेले भाऊसाहेब काळे हे 1972 ते 1977 या कालावधीत सारोळा कासारचे सरपंच होते. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. तसेच जुना सारोळा येथील ओढ्याकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर रक्षा विसर्जन न करता त्या रक्षेत वृक्षारोपण करण्यात आले. नगरमधील उद्योजक आणि इलेक्ट्रिकल कॉट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (ईकॅम) अध्यक्ष केशव काळे यांचे ते वडील होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा