कैलास मानससरोवर यात्रा सुखरूप पार केल्याबद्दल सत्कार

एन. डी. कुलकर्णी यांचे धाडस तरुणांना लाजविणारे – अभियंता सी. ए. मचाले

अहमदनगर- कैलास मानससरोवर ही अंत्यत कठीण व दुर्गम यात्रा आहे. त्यामुळे फार ठराविक भाविक ही दुर्गम यात्रा पायी जाऊन सुखरुप येतात. यासाठी मोठे मनोधैर्य, धाडस, इच्छाशक्ती लागते. निवृत्त अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी 64 व्या वर्षी ही दुर्गम यात्रा पायी सर करून सुखरुप परत आले. त्यांचे हे धाडस तरुणांना लाजविणारे आहे. त्यांच्यापासून आम्ही सर्वं ज्येष्ठ नागरिकांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधिक्षक अभियंता सी. ए. मचाले यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. कुलकर्णी यांनी नुकतीस कैलास मानससरोवर यात्रा पायी जावून सुखरुप पार केली. याबद्दल संघाच्यावतीने निवृत्त अभियंता सी. ए. मचाले यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष ए. के. खरात, एन. एम. परदेशी, सचिव सी. जी. डिक्कर, सहसचिव बी. डी. जोगदंड, खजिनदार आर. बी. वायस, सहखजिनदार एस. डी. निद्रे आदी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष परदेशी म्हणाले, सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर शक्यतो सर्व कर्मचारी शांत बसून कुटूंबात रममाण होतात. मात्र एन. डी. कुलकर्णी सारखे फार कमी लोक आहेत की जे सेवानिवृत्तीनंतरही विविध कार्यात सहभागी होत काम करत आहेत. 64 व्या वर्षी कैलास पर्वत सर करून सुखरुप परत येणे हे अत्यंत कठिण मोहिम पार केली. त्यांचे हे धाडस अभिनंदास्पद असून, आम्हा सर्व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना प्रेरणा देणारे आहे.

सत्कारास उत्तर देतांना एन. डी. कुलकर्णी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करतांना विकास कामांना मार्गी लावण्याबरोबरच माणसे जोडली. निवृत्तीनंतर सामाजिक कामात झोकून दिले. ट्रेकिंगला जाणे हा माझा पूर्वीपासूनचा छंद आहे. कैलास पर्वतावरून जाऊन भगवान शंकर व पार्वती माता वास्तव्यास असलेल्या स्थानाचे दर्शन घेण्याची खूप वर्षापासूनच इच्छा या कैलास मानससरोवरच्या मोहिमेमुळे पूर्ण झाली आहे.

यासाठी आई-वडिलांच्या आशिर्वादाबरोबरच अनेकांनी मला आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. म्हणून सर्वात अवघड ही मोहिम कोणतेही संकट न येता यशस्वीरित्या पार केली. असे सांगून कैलास मानससरोवर यात्रेतील प्रमुख घटना, प्रसंग व यात्रेला जाण्यासाठी करावयाची तयारी सविस्तर सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी. जोगदंड यांनी केले. यावेळी सदस्य एल. एम. वाखुरे, ए. ए. कांबळे, एस. बी. बोरुडे, आर. एल. गाजेंगी, जी. डी. घुगरकर, जे. पी. कर्डिले आदींसह संघाचे निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा