स्त्रिया जोडवी का घालतात?

जोडवी

जोडवे या अलंकारामुळे स्त्रीला तिचा स्त्रीधर्म, कर्तव्य अन् नियम यांची सातत्यानेे जाणीव होते. त्यामुळे स्त्री स्वैराचार न करता बंधनात अडकून रहाते.

परंपरेनुसार पायांच्या अंगठ्यांच्या शेजारील, म्हणजेच दुसर्‍या बोटामध्ये जोडवी घातली जायला हवीत. पायांच्या अंगठ्याशेजारील बोटामध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी आहे. ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. ह्या नसेवर, पायांमध्ये जोडवी घातल्याने दबाव पडतो व त्यामुळे या नसेशी निगडित अवयवांचे कार्य सुरळीत चालते.

 पायांध्ये ज्या बोटांध्ये जोडवी घातली जातात त्या बोटामध्ये असलेल्या नसेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. त्यामुळे पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने महिलांच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. तसेच जोडव्यामुंळे सायटिक नर्व्हवर दबाव येऊन त्याच्या आसपासच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारून गर्भाशय, मूत्रपिंड आणि आतड्यांमधील रक्तस्राव सुरळीत राहतो.
पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रजनेन्द्रियांचे कार्य सुरळीत चालत राहून मासिक धर्म नियमित होतो. तसेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे. चांदी ऊर्जावाहक आहे. त्यामुळे जमिनितली ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा