जेऊर अंगणवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप

अहमदनगर – येथील कोकणवाडीच्या अंगणवाडीतील चिमुरड्यांना गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी विवीध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

अंगणवाडीतील विद्यार्थिनी आकांक्षा सुनिल सोनवणे हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजीक कार्यकर्ते सुनिल सोनवणे, अशोक येवले, सोमनाथ तोडमल, पै. अमोल दारकुंडे, मयुर मकासरे यांच्या हस्ते चिमुकल्यांना पेन्सिल, रबर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करुन सुनिल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. यावेळी अंगणवाडी सेविका मंगल बनकर व मदतनीस मिना शेलार, आकाश सोनवणे, दिपक जाधव उपस्थित होते.